पुणे : प्रतिनिधी : भरधाव डंपरने फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. त्यात दोन बालकांसह तिघांचा मृत्यू झाला. सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री पुण्यातील वाघोली येथील केसनंद फाट्यावर ही घटना घडली. डंपरचालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. वैभवी रितेश पवार ( वय १ वर्षे ), वैभव रितेश पवार (२ वर्षे), रिनेश नितेश पवार,( ३०) अशी मृतांची नावे आहेत. (pune accident )
वाघोली येथील केसनंद फाट्यावर पुण्याकडून येणाऱ्या बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीच्या भरधाव डंपरने फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मुलांच्या काकांसह दोन बालकांचा समावेश आहे. सहाजण गंभीर जखमी झाले. तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना ससून रुग्णालयात हलविले आहे. (pune accident )
अमरावती येथून रविवारी रात्री मजुरांची एक टोळी कामासाठी आली होती. अंदाजे एकाच कुटुंबातील बारा जण फूटपाथवर झोपले होते. तर शंभर ते दीडशे जण फूटपाथच्या बाजूला झोपड्यात झोपले होते.
हेही वाचा :