वॉशिग्टंन : तांबड्या सम्रुदात हैती बंडखोरावर कारवाई करताना अमेरिकन सैन्याने स्वत:चे एक फायटर विमान पाडले. सैन्याच्या चुकीमुळे एफ १८ लढाऊ विमानातील दोन पायलटना विमान सोडून स्वत:चा बचाव करण्याची वेळ आली. दोघां पायलटंना किरकोळ जखमा झाल्या आहेत. आज (दि.२२) सकाळी ही घटना घडली. (US Army)
अमेरिकेच्या सेंट्रल कमांड करुन यमन देशातील हैती बंडखोरावर कारवाई सुरू आहे. मागच्या शनिवारी अमिरेकी लढाऊ विमानानी हैती बंडखोराचा गड मानला जाणाऱ्या यमन देशाची राजधानी सनावर बॉम्बफेक केली होती. हैती बंडखोरांच्या मिसाईड भांडार हे अमेरिका सैन्याचे लक्ष्य होते. तांबड्या सम्रुदात बंडखोरांचे एक ड्रोन आणि अँटी शिप क्रूज मिसाईलही नष्ट केले होते.
हैती बंडखोर तांबड्या सम्रुद, बाब अल मंदाब आणि एडन च्या खाडीत अमेरिका सैन्य तळ आणि व्यापारी जहाजांना लक्ष्य करत आहेत. त्याविरुध्द अमेरिका सैन्याची कारवाई सुरू आहे. अमेरिका सेंट्रल कमांडने असे सांगितले की, अमेरिकेने स्वत:च्या विमानावर केलेला हल्ला हा फ्रेंडली फायर ची (आपल्याच विमानांवर गोळीबारी) कारवाई होती. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. सेंट्रल कमांडने सांगितले की गाइडेड क्रुजर मिसाईलमधून अमेरिक नेव्ही च्या विध्वसंक यूएसएस गेटीसबर्ग मधून चुकून मिसाईल सोडल्याने त्या मिसाईलटने एफ १८ विमानाला लक्ष्य केले. त्यामुळे विमानातील पायलटचा जीव धोक्यात आला. त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी आपत्कालीन यंत्रणेचा वापर केला आणि जीव वाचवला. (US Army)
हेही वाचा :
- आयफोन आता ‘देवा’चा झाला !
- झोपेत श्वास अडखळणाऱ्या विकारावरील औषधाला मंजुरी
- ‘पेगासस-एनएसओ’ला अमेरिकन कोर्टाचा तडाखा