Home » Blog » ‘पुष्पा’ अडचणीत; ‘त्या’ चेंगराचेंगरीतील मुलगा ‘ब्रेन डेड’

‘पुष्पा’ अडचणीत; ‘त्या’ चेंगराचेंगरीतील मुलगा ‘ब्रेन डेड’

सरकारकडून सर्व ती मदत

by प्रतिनिधी
0 comments
Allu Arjun

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पुष्पा २ या चित्रपटामुळे आणि हैदराबाद येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणामुळे अल्लू अर्जुन चांगल्याच चर्चेत आहे. हैदराबादमधील सध्या थिएटर येथे पुष्पा २ च्या स्पेशल स्क्रिनिंग शो झाला होता. यावेळी अल्लू अर्जुनने या ठिकाणी अचानक उपस्थिती लावल्यामुळे तेथे चेंगराचेंगरी झाली होती. यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर, नऊ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. आता त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. (Allu Arjun)

चेंगराचेंगरीत गंभीर झालेल्या श्रीतेज नावाच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. त्याचा ब्रेन डेड झाला असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. श्रीतेजवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलने मंगळवारी (दि.१७) जारी केलेल्या अहवालामध्ये सांगितले की, श्री तेजवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

सरकारकडून मदत

आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे सचिव ख्रिस्टीना झेड चोंगथू यांनी सांगितले की, “आम्ही हॉस्पिटलला श्री तेजची आवश्यक ती काळजी देण्याचे निर्देश दिले आहेत. यासह सरकारदेखील आवश्यक ते सर्व सहकार्य करत आहे.” असे त्यांनी पुढे म्हटले. (Allu Arjun)

अल्लू अर्जुनची खास पोस्ट

”या दुर्दैवी घटनेनंतर श्री तेजच्या प्रकृतीबद्दल आम्ही चिंतित आहोत. तो लवकर बरा व्हावा यासाठी माझी प्रार्थना. मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला लवकर भेटण्यास उत्सुक आहे.” अशा भावना अल्लू अर्जुनने X वर पोस्ट करत व्यक्त केल्या होत्या. (Allu Arjun)

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00