मुंबई : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून कोल्हापूरच्या परिवर्तन कला फाउंडेशनने सादर केलेल्या कोल्हापूर या संस्थेच्या संगीत मतीविलय या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. निष्पाप कला निकेतन या संस्थेच्या ‘बाई मी दगूड फोडते,’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केली. (Sangeet Mativilay)
या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेची प्राथमिक फेरी कोल्हापूर केंद्रावर पार पडली. गडहिंग्लज कला अकादमी या संस्थेच्या आणि कुंभाराचं काय झालं? या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. (Sangeet Mativilay)
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक सतिश तांदळे (नाटक – संगीत मतीविलय), द्वितीय पारितोषिक देविदास आमोणकार (नाटक – बाई मी दगुड फोडते), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक आशिष भागवत (नाटक – तिचे संदर्भ नसलेली गोष्ट), द्वितीय पारितोषिक कपिल मुळे (नाटक – श्वेतवर्णी शामकर्णी), नेपथ्य : प्रथम पारितोषिक गायत्री कुंभार (नाटक म्याडम), द्वितीय पारितोषिक ओंकार घोरपडे (नाटक – रायगडाला जेव्हा जाग येते), रंगभूषा प्रथम पारितोषिक प्राण चौगुले (नाटक- भाऊबंदकी), द्वितीय पारितोषिक सुनिता वर्मा (नाटक – तिचे संदर्भ नसलेली गोष्ट) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक संतोष अबाळे (नाटक – तिचे संदर्भ नसलेली गोष्ट) व संपदा गावस (नाटक -भाऊबंदकी).(Sangeet Mativilay)
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे
साक्षी झिरंगे (नाटक – मोक्षदाह), डॉ. यशोदा जाधव (नाटक – पद्मश्री धुंडीराज), श्रृती धनवडे (नाटक – चल थोडं अॅडजेस्ट करु), त्रिवेणी ठाकुर-देसाई (नाटक – म्याडम), मानसी बोळुरे (नाटक – श्वेतावर्णी श्यामकर्णी), ओंकार नलावडे (नाटक- रायगडला जेंव्हा जाग येते), सुशांत करोशे (नाटक – अॅन एनिमी ऑफ द पिपल), दत्ता सुतार (नाटक-आणि कुंभारचं काय झालं ?), संभाजी कांबळे (नाटक -गांधीनितीचे २१ दिवस), धनंजय पाटील (नाटक- श्वेतवर्णी शामवर्णी)
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अविनाश कोल्हे, प्रवीण शांताराम आणि श्रीमती पूर्वा खालगांवकर यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी पारितोषिक प्राप्त संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले.
हेही वाचा :
पाताल लोक; अधोविश्वावरचा प्रखर प्रकाशझोत
पुराणकथेचा समकालीन अन्वयार्थ