सतीश घाटगे, कोल्हापूर
प्रत्येक निवडणूकीत मुश्रीफ अडचणीत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाही सलग सहाव्यांदा डबल हॅटट्रीक नोंदवणारे कागल मतदारसंघातील आमदार हसन मुश्रीफ चौथ्यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. सध्याच्या महायुतीच्या मंत्रीमंडळात ते एकमेव मुस्लीम अल्पसंख्य कॅबिनेट मंत्री आहेत. (Hasan Mushrif)
पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, सलग सहावेळा आमदार, वीस वर्षे मंत्रीपद भूषवणाऱ्या हसन मुश्रीफांना राजकारण आणि समाजकारणाचा मोठा अनुभव आहे. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे यांच्या कागल राजकीय विद्यापीठातून तयार झालेले हसन मुश्रीफ १९९९ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झाले. पहिल्यांदा ऑक्टोंबर १९९९ मध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात पधुसंवर्धन, दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे.त्यानंतर झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात त्यांच्याकडे जुलै २००४ पासून शालेय शिक्षण, पशुसंवर्धन व दुग्ध विकास, औकाफ खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. डिसेंबर २००८ पासून नगरविकास, जमीन कमाल धारणा, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, अल्पसंख्यांक विकास (औकाफसह) विधी व न्याय या खात्यांचा कार्यभार मुश्रीफ यांनी सांभाळला आहे.
२००९मध्ये विधानसभेवर सलग तिसऱ्यांदा हसन मुश्रीफ विक्रमी मताने निवडून आले आणि पहिल्यांदा त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. अशोकराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण मंत्रीमंडळात नगरविकास, कमाल जमीन धारणा, पशुसंवर्धन, दुग्ध्यविकास, मत्स्यव्यवसाय, अल्पसंख्याक विकास (औकाफसह) विधी व न्याय या खात्याचा राज्यमंत्री तसेच; कामगार व जलसंपदा या खात्याचा कॅबिनेटमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे. (Hasan Mushrif)
२०१४ मध्ये ते विधानसभेवर चौथ्यांदा निवडून आले पण राज्यात भाजप महायुतीचे सत्तेवर असल्याने पाच वर्षे ते विरोधी पक्षात होते. २०१९ मध्ये विधानसभेवर सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवड झाली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. अडीच वर्षानंतर राज्यात सत्तांत्तर होऊन एकनाथ शिंदे यांचे मंत्रीमंडळ अस्तित्वात आहे. पण अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन भाजप, शिवसेना महायुतीत प्रवेश केला. त्यानंतर मुश्रीफ यांनी दोन जुलै २०२३ वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य या खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
२०२४ च्या निवडणूकीत महायुतीला भारी बहुमत मिळाले. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्येष्ठ मंत्री म्हणून वयाच्या ६८ व्या वर्षी हसन मुश्रीफ यांनी सलग चौथ्यावेळी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. पंचायत समिती अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री असा हसन मुश्रीफ यांचा प्रवास सुरू आहे.
◻️LIVE 📍राजभवन, नागपूर
🗓️ 15-12-2024📹 राज्य मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा – लाईव्ह
https://t.co/IXTqNjR2Ie— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 15, 2024
हेही वाचा :
- भुजबळ, वळसे-पाटील, मुनगंटीवारांचा पत्ता कट
- मंत्रीमंडळात सातारा जिल्ह्याचा दबदबा
- आपने केली उमेदवारांची अंतिम यादी जाहीर