Home » Blog » दिल्लीतील ४० हून अधिक शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी

दिल्लीतील ४० हून अधिक शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी

दिल्लीतील पालक हादरले

by प्रतिनिधी
0 comments
Bomb threat to Delhi school

नवी दिल्ली :नवी दिल्लीतील ४० हून अधिक शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई मेल्सच्या माध्यमातून देण्यात आली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धमकी देणाऱ्याने ३० हजार डॉलर्सची खंडणी मागितली. ही रक्कम न दिल्यास या शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच पालक हादरून गेले. (Bomb threat to Delhi school)

दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना सकाळी ७.०६ वाजता बॉम्बच्या धमकीबद्दल पहिला अलर्ट आला.cब्रिटिश स्कूल, चाणक्यपुरी द मदर्स इंटरनॅशनल, अरबिंदो मार्ग, मॉडर्न स्कूल मंडी हाऊस, डीपीएस वसंत कुंज, दिल्ली पोलिस पब्लिक स्कूल, सफदरजंग, डीपीएस पूर्व कैलास, केंब्रिज स्कूल आणि सलवान पब्लिक स्कूल या शैक्षणिक संस्थांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. रविवारी रात्री ११.३८ च्या सुमारास ईमेल आल्यानंतर खबरदारी म्हणून मदर मेरी स्कूलने विद्यार्थ्यांना घरी पाठवले.

ई मेलमध्ये काय?

इमारतीत अनेक बॉम्ब पेरले आहेत. बॉम्ब लहान आहेत. ते अतिशय चांगल्या पद्धतीने लपवले आहेत. त्यामुळे इमारतीचे फार नुकसान होणार नाही. पण स्फोट झाल्यावर अनेक लोक जखमी होतील. मला ३० हजार डॉलर्स मिळाले नाहीत तर स्फोट करीन, अशी धमकी ई मेलमध्ये देण्यात आली आहे.

दरम्यान, शाळा बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचे वृत्त समजताच संबंधित शाळांचे पालक हादरून गेले. जीडी गोएंका येथील पालक विपिन मल्होत्रा म्हणाले, आमचे मूल शाळेत पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाने आम्हाला शाळेच्या व्यवस्थापनाकडून कॉल आला.
दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी केंद्र सरकारला या प्रकरणात दोषी धरले आहे. केंद्र सरकारने योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळलेली नाही, अशी टीका त्यांनी केली. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही परिस्थिती योग्यरित्या हाताळली पाहिजे, अशी मागणी केली आहे. (Bomb threat to Delhi school)

याआधीही नवी दिल्लीत बॉम्बच्या धमक्या आल्या होत्या. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकार आणि पोलिसांना आठ आठवड्यांच्या आत अशी प्रकरणे हाताळण्यासाठी योजना तयार करण्याचे आदेश दिले होते. मे महिन्यात, शहरातील २००हून अधिक शाळा, रुग्णालये आणि इतर महत्त्वाच्या सरकारी आस्थापनांना अशाच प्रकारची बॉम्बची धमकी मिळाली होती. परंतु व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) वापरून हा मेल पाठवण्यात आल्याचे उघड झाले होते. त्यामुळे याबाबत काही कारवाई झालेली नाही.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00