कोल्हापूर; प्रतिनिधी : सिंधुदुर्ग विभागाने सांगली विभागाचा सात गडी राखून पराभव करत राज्य परिवहन मंडळ क्रिकेट स्पर्धा जिंकली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कामगार कल्याण समिती, कोल्हापूर विभाग आयोजित ही स्पर्धा शास्त्रीनगर मैदानावर खेळवण्यात आली. (ST Cricket)
अंतिम सामना सांगली विभाग विरुद्ध सिंधुदुर्ग विभाग यांच्यात झाला. सनराइज हॉस्पिटल चे डॉ. अभिजीत कोराणे यांचे हस्ते नाणेफेक झाली. सांगली विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण फलंदाजीचा निर्णय फलदायी ठरला नाही. सांगली विभागाचा डाव १५.४ षटकात ४१ धावावर आटोपला. सांगलीचा एकही फलंदाज दोन अंकी धावा करू शकला नाही. सिंधुदुर्गच्या स्वदेश नाईक आणि बाबा धुरीने भेदक मारा करत प्रत्येकी तीन गडी बाद केले.
सांगलीचे ४१ धावांचे माफक आव्हान सिंधुदुर्ग विभागाने ७.५ षटकात तीन गडी गमावून पार करत एकतर्फी विजय संपादन केला. सिंधुदुर्ग तर्फे लक्ष्मण कळंगुटकर फलंदाजीत नाबाद १२ धावा केला. सिंधुदुर्गने सात गडी राखून सामना जिंकत स्पर्धेवर नाव कोरले. स्वदेश नाईकला सामनावीर घोषित करण्यात आले. (ST Cricket)
बक्षीस वितरण महाराष्ट्राचा माजी रणजी खेळाडू संग्राम अतीतकर माजी यांच्या हस्ते झाले. यावेळी काकासाहेब पाटील, एसटीचे विभागीय नियंत्रक शिवराज जाधव विभाग, यंत्र अभियंता यशवंत कांनतोडे, संतोष बोगरे, विभागीय वाहतुक आधिकारी, संदीप भोसले, कामगार अधिकारी अनिल पार्टे, अतुल मोरे, मानिनी तेलवेकर, संग्राम शिंदे, गीतांजली सूर्यवंशी आदी उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन दिपक घारगे,सचिन पाटील, अनंत चिले, प्रतीक शिंदे,सचिन मलके, संदेश मराठे, दिगम्बर कांबळे, प्रभुदास सोनुले, युवराज पाटिल, ओंकार पाटिल, आकाश सुर्यवंशी , बाळासाहेब माने, तेजस विचारे, संजय कुंभार यांनी केले.
हेही वाचा :
- फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती
- ३१ वर्षे तुरुंगवास आणि १५४ फटक्यांची शिक्षा, कोण आहेत नरगिस मोहम्मदी?
- ‘महामानवाला द्या शैक्षणिक मानवंदना’