Home » Blog » संभाजीनगर, सोलापूर संघांचे विजय, अब्दुल्ला शेखचे शतक

संभाजीनगर, सोलापूर संघांचे विजय, अब्दुल्ला शेखचे शतक

राज्य परिवहन महामंडळ क्रिकेट स्पर्धा

by प्रतिनिधी
0 comments
Cricket Tournament

कोल्हापूर; प्रतिनिधी : शास्त्रीनगर मैदानावर सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळ किक्रेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभाग आणि सोलापूर विभागाने प्रतिस्पर्धी संघांवर दणदणीत विजय मिळवला. सोलापूरच्या अब्दुला शेखने तडाखेबंद शतक झळकावत ४८ चेंडूत ११९ धावा चोपल्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कामगार कल्याण समिती कोल्हापूर विभागाने स्पर्धेचे आयोजन केले आहे.

आज पहिला सामना मध्यवर्ती कार्यशाळा छत्रपती संभाजीनगर विरुद्ध मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी या सामन्याची नाणेफेक काकासाहेब पाटील यांचे हस्ते झाली. संभाजीनगर संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १७४ धावा केल्या. यामध्ये राजरत्न सोनकांबळेने अर्धशतक झळकावत ५० धावा केल्या. महेश वैद्यने ४२ धावा तर रवींद्र बोर्डेने २९ धावांचे योगदान दिले. दापोडीकडून अक्षय उभेने तीन गडी बाद केले.  महेश कांबळे व उमेश पवाडे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

संभाजीनगर संघाच्या धावाचा पाठलाग करताना दापोडी संघ २० षटकात आठ बाद १२७ धावाच करू शकला. निलेश अकोटकर नाबाद ४५ धावा तर मुकेश आवळेने ३९ धावा केल्या. संभाजीनगर कडून कर्णधार रवींद्र बोर्डेने तीन गडी बाद केले.  संजय नागरगोजे व महेश वैद्य यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. संभाजीनगर विभागाने ४७ धावांनी सामना जिंकला.

दुपारच्या सत्रातील सामना सोलापूर विभाग विरुद्ध जालना विभाग यांच्यात झाला. या सामन्याची नाणेफेक मुंबई क्राईम ब्रँचचे  अजय बिराजदार यांच्या हस्ते झाले. सोलापूर विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात पाच बाद २९० धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात स्पर्धेतील पहिला शतकवीर अब्दुल्ला शेख याने तडाखेबंद फलंदाजी करत ४८ चेंडूत ११९ धावा केल्या यामध्ये ११ षटकार व नऊ चौकारांचा  समावेश आहे. हर्षद आठलेने ५७ धावा, रोहन तारापूरकरने ४९ धावा केल्या. जालनाकडून वैभव शिरगांवकर व योगेश गीते यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

उत्तरार्धात फलंदाजी करताना जालना विभाग १८.२ षटकात ७९ धावात आटोपला. समाधान चेकेने १८ धावा केल्या. सोलापूर तर्फे गोलंदाजीत श्रीपती होटकर, उमर मुजावर व उमेश पोवार यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. सोलापूर संघाने हा सामना २११ धावांनी जिंकला.

स्पर्धेचे नियोजन कामगार अधिकारी संदीप भोसले, दिपक घारगे, बाळासाहेब माने, शीतल चिखलव्हाळे, सचिन पाटील, अनंत चिले, आकाश सूर्यवंशी,  तेजस विचारे, संदेश मराठे,  प्रभुदास सोनुले, ओंकार पाटील व युवराज पाटील, दिगंबर कांबळे,  सचिन मलके करत आहेत.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00