Home » Blog » गुणकारी आंबेहळद

गुणकारी आंबेहळद

गुणकारी आंबेहळद

by प्रतिनिधी
0 comments
Beneficial Ambehalad file photo

पुर्वीपासून अपघातात कींवा पडल्यानंतर मुक्कामार लागून वेदना होत असतील कींवा एखाद्या वेळेस शरीराला सुज आली असल्यास आंबेहळदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे. आंबेहळद आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगली मानली जाते. आता सध्या आयुर्वेदिक दुकानात आंबेहळद मिळते. आंबेहळदीचे अनेक गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे आयुर्वेदात आंबेहळदीला महत्वाचे स्थान आहे. आंबेहळदीचे शास्त्रीय नाव क्युरकुमा अमाडा होय. दक्षिण आशिया, आग्नेय आशिया येथे या वणस्पतीचा आढळ आहे. हळदीच्या सजातीय प्रजातीमधील एक ओषधी वणस्पती आहे.

आंबेहळदीचे उपयोग

१) कोणत्याही कारणाने दुखापत होऊन रक्त साकळले असल्यास, आंबेहळद उगाळून लावावी.

२) सूज कमी होऊन वेदना शांत होण्यासाठी.

३) लचकणे, मुरगळणे, सूजणे यावर आंबेहळदीचा लेप लावल्यास, वेदना कमी होतात.

४) शरीरावर गाठ आल्यास, आंबेहळदीच्या लेपाने ती बसते.

आंबेहळद आणि दुधावरची साय चेहऱ्यावर एकत्र लावल्यास त्वचेचा रंग उजळतो. आंबेहळदीचे चूर्ण घेतल्यामुळे अग्निमांध विकारात सत्वर फायदा होतो. भूक चांगली लागते आणि लहान व मोठय़ा आतडय़ातील वायू मोकळा होतो. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पचनाकरिता आंबेहळदीचा विशेष उपयोग होतो. आंबेहळदीला हळदीप्रमाणेच लवकर कीड लागू शकते. त्यामुळे कीड न लागलेल्या आंबेहळदीचाच वापर लेप लावण्याकरिता आणि पोटात घेण्याकरिता उपयोग करावा. आंबे हळदीमध्ये अँटी-मायक्रोबिअल गुणधर्म आहेत, जे कित्येक प्रकारच्या सूक्ष्मजीवांपासून होणाऱ्या रोगापासून मुक्तता होण्यास मदत  करतात. तसेच त्यापासून होणाऱ्या संसर्गाविरोधात लढण्यास शरीराला साथ देतात.

श्वसनाशी सबंधीत समस्येपासून आराम

आंबे हळदीमुळे श्वसनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकतो, असे म्हणतात. खोकला, सर्दी यासारखे श्वसनप्रणालीशी संबंधित समस्या नियंत्रणात येऊ शकतात.

सांधेदुखीची समस्या कमी

काही वेळा विविध कारणांनी शरीराला सुज येते. याबाबत आंबेहळद गुणकारी ठरते. यामुळे शरीराला आलेली सूज तसेच सांधेदुखीची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार याचा वापर केल्यास शरीराचे सांधे मजबूत होऊ शकतात.

कर्क्युमिनोइड्स घटकयुक्त

आंबे हळदीमध्ये कर्क्युमिनोइड्स घटक आहेत, जे आपल्या अँटी- इंफ्लेमेटरी गुणधर्मासाठी ओळखले जातात. यामुळे शरीरावरील सूज कमी करणे व त्यापासून होणाऱ्या आजारांची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00