Home » Blog » शिरोळ : राजेंद्र पाटील यड्रावकर दुसऱ्यांदा विजयी

शिरोळ : राजेंद्र पाटील यड्रावकर दुसऱ्यांदा विजयी

यड्रावकर ४१ हजार १९६ मताधिक्याने विजयी

by प्रतिनिधी
0 comments
Rajendra Patil Yadravkar file photo

जयसिंगपूर; प्रतिनिधी : शिरोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे ४१ हजार १९६ मताधिक्याने विजयी झाले आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून राजेंद्र पाटील यड्रावकर प्रत्येक फेरीत आघाडी घेतली. साडेबाराच्या सुमारास शिरोळ मधील ३०७ मतदान केंद्रावरील १२ टेबलवर २२ फेऱ्यांमध्ये मत मोजणी झाली. यात महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. तर स्वाभिमानीचे उमेदवार उल्हास पाटील यांना जोराचा धक्का बसला असून त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. शिरोळ तालुक्यातील जनतेने विकास कामांना प्राधान्य दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. गत विधानसभेत राजेंद्र पाटील यड्रावकर २७००० च्या फरकांनी निवडून आले होते. (Rajendra Patil Yadravkar)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00