Home » Blog » फसवणुकीचा नवा धंदा

फसवणुकीचा नवा धंदा

फसवणुकीचा नवा धंदा

by प्रतिनिधी
0 comments
online security file photo

-सतीश तांबे

सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक गोष्टी समोर येत असतात…त्यात कुणाही अनोळखी सोर्सला OTP देऊ नका असं बजावलेलं असतं. आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे खोटी आमिषं दाखवून जाळ्यात ओढणे…जसं की मला मध्यंतरी आमच्या जाहिराती Like करून घरबसल्या पैसे कमावण्याच्या मेसेजेसनी वात आणला होता..आपल्याला असे कोणते मोहच नसल्यामुळे आपण निर्धास्त आहोतअसा मी समज करून घेतला होता..पण गेल्याच आठवड्यात मला ऑफलाइन फसवणुकीचा फटका बसला तो अनुभव इथे लोकांना सावध करण्यासाठी देतो. सकाळी 12 च्या सुमाराला मी बांद्रा पश्चिमला स्टेशनबाहेर पडल्यावर एक शर्ट व्यवस्थित इन केलेला, कंबरेला बेल्ट, चष्मा , डोक्यावर कॅप घातलेला सुमारे 55 वयाच्या माणसाने मला अडवलं आणि म्हटलं” अरे अंकल आप इधर ? ” चेहेरा ओळखीचा न वाटल्यामुळे मी म्हटलं की ” मैने पहचाना नही आपको” तर तो म्हणाला ” अंकल, आप हमारे दुकान में काफी टाइम आते थे. महावीर स्टोअर्स… “मी खूपच घाईत होतो, त्यामुळे मी ” अच्छा..” म्हणून निघायच्या तयारीत असतानात्याने माझा हात धरला आणि म्हटलं की ” मुकेशभाई दिवाली गिफ्ट दे रहे है, आपने लिया की नही? “मला फ्री गिफ्ट/ सेल वगैरेचा मोह लहानपणापासून कधीही नसल्यामुळे मी म्हटलं ” मुझे नही चाहिये..” तर कॅपवाला म्हणाला ” आप लेके मुझे दे दो…देखो उधर सामनेही है. मै लेके जाता हूँ आपको ” असं म्हणून त्याने मला हाताला धरून समोरच्या गल्लीत नेलं, तिथे एका गाडीवर साधारण त्याच वयाचा माणूस उभा होता. तो मला म्हणाला ” अभी कोटा खतम होते आया है, जल्दी करो” असं म्हणून त्याने माझ्या हातात एक कॅलक्युलेटर कोंबला. एवढ्यात मला तिथे नेणार्या व्यक्तीने म्हटलं की “बचे हुए मुझे दे दो” तर त्या माणसाने नकार दिला. तो म्हणाला”आपने लिया है…अब पैसे दे दो..तीन हजार रुपये..”तर तो माणूस द्यायला लागला. तर तो गिफ्टदाता म्हणाला ” मै अंकल के नाम पे देता हूँ. उनसे पैसा लुँगा, आप बाद मे उन्हे दे दो” असं म्हणून त्याने मला आणखी एक पर्फ्युमचा खोका दिला.”

दरम्यान कॅपवाला म्हणाला ” मेरे पुना मे तीन दुकान है. वहाँ मै लेके जाऊँगा. तुम अभी पैसे दे दो. मै आपको बाहर दे देता हूँ…”मी एक तर उशीर होत चालल्यामुळे गांजलो होतो, तर मी हजार रूपये दिले. त्यावर गिफ्टदाता म्हणाला की अंकल आपका नाम,पता, मोबाइल नंबर और सिग्नेचर दे दो..हमको बताना पडता है. किसको दिया.. तर मी ते लिहित असताना, तो कॅपवाला मागच्या मागे गुल झाला..मी जरासा गांगरलो..तो गिफ्टदाता म्हणाला की ” वो दाये तरफ गये है..”तर तिकडे तो नव्हता. पुन्हा पाठी गेलो, तर तो गिफ्टदाताही गुल झाला होता.मला कळलं की आपण लुटले गेलो आहोत. आपण कधीही वापरल्या नाहीत अशा फार तर 200 रुपयांच्या वस्तू देऊन आपले 1000 रुपये लांबवले गेले आहेत. आता भीती ही आहे की मी नाव,पत्ता,मोबाइल, सही दिली आहे, त्यातून आणखी काही फसवणूक होऊ शकेल का ?कालच मला ” मी पोलिस खात्यातून बोलतोय, असा एक फोन येऊन गेला. जो नंबर मी तात्काळ ब्लाॅक केला…तर एकूणात काय तर ऑन लाइन, ऑफ लाइन चीटिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आपण सतत सावध असायला हवं. हे कळण्यासाठीच मी हे पोस्ट करतो आहे.इथे कुणी पोलिस डिपार्टमेंटचे असतील, तर ते वांद्रे स्टेशनच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्हीत कदाचित त्या व्यक्तीला बघू देखील शकतील…मला अशा फसवणुकीचा हा पहिलाच अनुभव होता. मला जायची घाई असल्यामुळे मी असा फसलो… पण खरं तर हे समजूत काढणं झालं. तो कॅपवाला माणूस मला जेंटलमन वाटला होता, हेच खरं. बरं मला फ्री गिफ्टचा मोह काडीचाही नव्हता. मी त्याने दिलेलं भूल आणणारं काहीही खाल्लं प्यायलं नव्हतं. ह्याच्यापेक्षा खिसा कापलेला कमी तापदायक असतं, कारण तिथे आपण बेसावध असतो. इथे दिनदहाडे,बातो बातो मे त्याने शिताफीने मला जाळ्यात ओढलं होतं.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00