नियमित योगासनांचा सराव हा दिर्घायुष्याचा मार्ग आहे. विविध आसने केल्यामुळे आरोग्याबाबतच्या बहुतांश तक्रारी कमी होतात. आज आपण जाणून घेणार आहोत पश्चिमोत्तानासन या आसनाबद्दल.
पश्चिम दिशा किंवा शरीराचा मागील भाग आणि उत्तान म्हणजे या दिशेला ताणणे होय. यालाच पश्चिमोत्तानासन म्हणतात. व्यक्तीला पश्चिमोत्तानासन कसे करावे त्याचे फायदे काय आहेत. हे आसन करताना कोणती खबरदारी घ्यायला पाहीजे याविषयी योगा करणाऱ्या व्यक्तीला माहिती असावी लागते.
पश्चिमोत्तानासन करताना शरीराच्या मागच्या भागात म्हणजे मणक्यामध्ये ताण येतो, त्यामुळे या आसनाला पश्चिमोत्तानासन म्हणतात. इथे पश्चिम म्हणजे पश्चिम दिशा नसून मागचा भाग. या आसनामुळे शरीराचा संपूर्ण भाग ताणला जातो आणि ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. मधुमेहाची समस्या आहे त्यांच्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे याच्या नियमित सरावाने मधुमेहाची लक्षणे कमी होण्यास मदत करते. याशिवाय उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठीही हे आसन खूप फायदेशीर आहे.
कृती
पश्चिमोत्तानासन हे दिसायला खूप सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात या आसनाचा सराव करणे खूपच अवघड आहे. स्पॉंडिलेसिसच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे आसन करू नये. दोन्ही पाय समोर उघडून बसावे. पायांचे अंगठे व टाचा जुळवून घ्याव्यात. दोन्ही हात कंबरेच्या दोन्ही बाजूस ठेवावे. दोन्ही हात कंबरेच्या दोन्ही बाजूस ठेवावे. मान सरळ व नजर समोर असावी. थोडे समोर वाकून हनुवटी जमिनीला समांतर ठेवून कंबरेतून वाकून डाव्या हाताने डाव्या हाताचा अंगठा पकडावा व उजव्या हाताने उजव्या हाताचा अंगठा पकडावा. श्वास सोडत आणखी पुढे वाकून कपाळ गुडघ्यावर वाकवू नये किंवा गुडघे वर उचलून कपाळ गुडघ्याला लावू नये. अंगठे पकडता आले नाहीत तर घोटे पकडून शक्य तेवढे पुढे वाकावे. कोपरे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करावा. संथ श्वास चालू ठेवावा. हळू हळू हाताची पकड सोडून पूर्वस्थितीत यावे.
फायदे
- पचनसंस्था कार्यक्षम होते.
- श्वसनक्रीया सुधारते
- पोटर्यापासून मानेपर्यंतच्या मागील (पश्चिम) भागाच्या स्नायूंना ताण बसतो.
- शरीर लवचिक होते.