Home » Blog » आयटी पार्कद्वारे स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करणार – राजेश क्षीरसागर

आयटी पार्कद्वारे स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करणार – राजेश क्षीरसागर

बापट कॅम्प परिसरात सभेला उदंड प्रतिसाद

by प्रतिनिधी
0 comments
Rajesh Kshirsagar

कोल्हापूर; प्रतिनिधी : स्थानिक उच्चशिक्षित युवकांना आणि युवतींना या ठिकाणीच नोकरी मिळावी यासाठी कोल्हापुरात आयटी पार्क उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी केले. बापट कॅम्प येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेच्या जयश्री जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, सत्यजित उर्फ नाना कदम, राष्ट्रवादीचे आदिल फरास आदी मान्यवर उपस्थित होते.

राजेश  क्षीरसागर म्हणाले, आपल्या जिल्ह्य़ातील उच्चशिक्षित युवा-युवती नोकरीसाठी इतर शहरात जात आहेत. काही युवक विदेशात जात आहेत. आपली मुले बाहेर जाऊन उच्चपदावर काम करत आहेत, ही अत्यंत चांगली बाब आहे. मात्र यामुळे कुटूंब संस्था उद्ध्वस्त होत आहे. यासाठी आपल्या मुलांना इथेच उच्चपदाच्या नोकर्‍या उपलब्ध व्हाव्यात म्हणून आयटी पार्क सुरू होणे काळाची गरज आहे.

महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षांत राज्यात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. महायुतीला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे विरोधक बिथरले असून आमच्यावर बेछूट आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांचा डाव ओळखा आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन क्षीरसागर यांनी केले.

मी माझ्या आमदारकीच्या काळात तसेच राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून शहरात अनेक विकासकामे उभी केली. आपल्याकडे विकासकामांना सहकार्य करण्यापेक्षा विरोध करणारीच जास्त झाली आहेत. सामाजिक कार्य करत असताना विरोधक असावेत, पण त्यांच्या विरोधात प्रामाणिकपणा असावा. सत्य आणि तथ्य यासाठी विरोध व्हावा विरोधासाठी विरोध यामुळे कोल्हापूर मागे पडत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी माजी नगरसेवक राजसिंह शेळके, सतीश कुंभार बाचणीकर, महेंद्र तुकाराम कुंभार, अभिषेक जाधव, दीपक सातपुते, मीनाक्षी कुंभार, शमा कातवरे, शंकर कातवरे, अभिजित कुंभार, शैलेश कुंभार बाचणीकर, उत्तम मंडलिक, चंद्रकांत गोरंबेकर, प्रमोद कुंभार, अभिषेक ढेरे, अभिजित कातवरे आदी उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00