वारणानगर; प्रतिनिधी : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने शालेय राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. अकलूज जि. सोलापूर येथे या स्पर्धा पार पडल्या. वारणा महाविद्यालयाच्या कु.जानवी संजय खामकर, हर्षदा बाबासो शेळके व तनिष्का प्रदीप जगताप यांची निवड पतियाला (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. (Warana college)
या स्पर्धेतील अंतिम सामना यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, (कोल्हापूर विभाग) व के एस कॉलेज (मुंबई विभाग) यांच्यामध्ये झाला. यामध्ये कोल्हापूर विभागांने आठ गुणांनी सामना जिंकून राज्यस्तरावर अव्वल स्थान पटकावले.
वारणा माहवद्यालयाच्या संघाकडून उत्कर्षा सूर्यवंशी, आर्या भोसले, समृद्धी जाधव, ऋतिका गोसावी, वैष्णवी पाटील, प्रतीक्षा सिद, प्रणाली वांईगडे जिज्ञासा घोगे व समृद्धी पाटील यांनी संपुर्ण स्पर्धेत चमकदार कामिगरी केली. विजयी संघास श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे (सावकर), मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कार्जीनी, डॉ. कल्पना पाटील, प्राचार्य डॉ. ए. एम शेख, जिमखाना प्रमुख प्रा. क्रांतीकुमार पाटील, प्रशिक्षक उदय जाधव, उदय पाटील, रोहित घेवारी यांचे मार्गदर्शन मिळाले.
हेही वाचा :
- कोल्हापूरवरचा गद्दारीचा डाग पुसण्यासाठी राजू लाटकर यांना निवडून द्या – सतेज पाटील
- मोक्याच्या जागा दलालांना विकण्याचा मुश्रीफांचा घाट : स्वाती कोरी
- कन्व्हेन्शन सेंटरमुळे जिल्ह्याचा कायापालट होईल : महेश जाधव