Home » Blog » भारतासाठी ‘सरप्राईज’

भारतासाठी ‘सरप्राईज’

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

by प्रतिनिधी
0 comments
Nathan McSweeney file photo

मेलबर्न, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. यातून भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियाने एक खास सरप्राईज दिले आहे. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या नॅथन मॅकस्विनीचा ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीसाठी संघात स्थान दिले आहे.

काय आहे भारतासाठी सरप्राईज?

या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आधीच आपला संघ जाहीर केला आहे. या ट्रॉफीतील पहिला सामना पर्थच्या स्टेडियमवर होणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीआधी भारताचा अ संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. यात  ऑस्ट्रेलियाने भारतावर मालिकेत २-० असा एकतर्फी विजय मिळवला होता. या मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या नॅथन मॅकस्विनीला ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिल्या सामन्यात संधी दिली आहे.

कोण आहे नॅथन मॅकस्विनी?

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्याच झालेल्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यात नॅथनने शानदार कामगिरी केली होती. भारताविरुद्ध खेळताना त्याने दोन सामन्यांच्या चार डावांत ५५.३३ च्या सरासरीने १६६ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने घेतलेल्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाला अजून कायमस्वरूपी सलामीवीर सापडलेला नाही. यामुळे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या जागी नॅथन  सलमी करण्याची शक्यता आहे.

नॅथनबाबत काय म्हणाले जॉर्ज बेली

याआधीच ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी स्पष्ट केले होते. या मालिकेत स्टीव्ह स्मिथ त्याच्या जुन्या क्रमावरच फलंदाजी करताना दिसेल. नॅथनबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की त्याने भारताविरुद्धच्या सामन्यात आपली पात्रता सिद्ध करून दाखवली आहे. यासह त्याने शानदार कामगिरी करत अनेक विक्रम रचले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला ही संधी दिली आहे.

पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्विनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर. अश्विन, आर. जडेजा, आर. मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे वेळापत्रक

पहिली कसोटी : २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ

दुसरी कसोटी : ६-१० डिसेंबर, ॲडलेड

तिसरी कसोटी : १४-१८  डिसेंबर, ब्रिस्बेन

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00