नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कांद्याचे भाव वाढल्याने दिल्ली, मुंबई, लखनीसह देशातील अनेक शहरांमध्ये लोकांचे डोळे ओलावू लागले आहेत. यामुळे ग्राहक आणि विक्रेते दोघेही त्रस्त झाले आहेत. घाऊक बाजारात कांद्याचा भाव ४०-६० रुपये किलोवरून ७०-८० रुपये किलो झाला आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी नाफेड आणि ‘एनसीसीडी सारख्या संस्थांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘कांदा एक्सप्रेस’चा सार्वत्रिक परिणाम झालेला नाही.
दिल्लीतील एका विक्रेत्याने सांगितले, की कांद्याची किंमत ६० रुपयांवरून ७० रुपये प्रतिकिलो झाली आहे. आम्ही तो मंडईतून खरेदी करतो, त्यामुळे आम्हाला तिथून मिळणारे भाव या पातळीवर आहेत. आम्ही ज्या किंमतीला ते विकतो त्यावर परिणाम होतो, किंमती वाढल्याने विक्रीत घट झाली आहे. परंतु लोक अजूनही ते विकत घेत आहेत कारण येथील खाण्याच्या सवयींचा एक महत्त्वाचा भाग आहे.
फैजा या खरेदीदाराने कांद्याचे भाव वाढल्याने तिची अडचण सांगितली आणि म्हणाली, “कांद्याचे भाव वाढले आहेत, तर हंगामानुसार तो खाली यायला हवा होता. मी ७० रुपये किलोने कांदा खरेदी केला आहे. त्यामुळे मला महागात पडले आहे. मी सरकारला आवाहन करते, की किमान दररोज वापरल्या जाणाऱ्या भाज्यांच्या किमती कमी करा. ८ नोव्हेंबरला दिल्लीत कांद्याचा भाव ८० रुपये प्रति किलो इतका होता. मुंबईसह देशातील अनेक राज्यांमध्ये कांद्याचे भाव वाढले आहेत. मुंबईतील खरेदीदार डॉ. खान यांनी सांगितले, “कांदा आणि लसणाच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. त्या दुप्पट झाल्या आहेत. त्याचा परिणाम घरगुती बजेटवरही झाला आहे. मी ३६० ला५ किलो कांदा विकत घेतला.” आकाश या आणखी एका खरेदीदाराने सांगितले, की कांद्याचे भाव वाढले आहेत. कांद्याचे भाव ४०-६० रुपये किलोवरून ७०-८० रुपये किलो झाले आहेत.