Home » Blog » मराठवाड्यात तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या वारसदारांची प्रतिष्ठा पणाला

मराठवाड्यात तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या वारसदारांची प्रतिष्ठा पणाला

मराठवाड्यात तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या वारसदारांची प्रतिष्ठा पणाला

by प्रतिनिधी
0 comments
One Nation One Election

रणजित खंदारे; छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठ जिल्हांत विधानसभेच्या ४६ जागा आहेत. यंदा २०२४ च्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपने २० जागांवर उमेदवार दिले आहेत. शिवसेनेने (शिंदे गट) १६ तर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) नऊ जागी उमेदवार दिले आहेत. यातील चार जागा भाजपने मागीलवेली लढवल्या होत्या, त्या अजित पवारांना दिल्या आहेत. महायुतीकडून एक जागा राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडली आहे.

मागील २०१९ च्या निवडणुकीत भाजपने २४ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १६ जागी त्यांना यश मिळाले होते. तर मित्रपक्ष असलेल्या (एकत्रित) शिवसेनेला २२ पैकी १२ जागी यश मिळवले होते, विरोधी आघाडीकडून काँग्रेसने २१ तर राष्ट्रवादी काँग्रेसने (एकत्रित) २२ जागा लढवल्या होत्या, त्यातील दोन्ही पक्षांना प्रत्येकी आठ जागी विजय मिळाला होता. शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. त्यावेळी बहुजन वंचित आपाडीने सर्वाधिक ४४ जागांवर तर त्यांच्याशी असलेली युती तुटल्याने एमआयएमने १० जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, या दोन्ही पक्षांना एकही जागी यश मिळाले नाही. बंदाची निवडणूक प्रामुख्याने लातूर, निलंगा, भोकर मतदारसंघात मराठवाड्यातील मानी मुख्यमंत्र्यांच्या पुढच्या पिढीसाठी प्रतिष्ठेची असणार आहे.

देशमुख विरुद्ध चाकूरकर लढत

लातूर मतदारसंघात काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांच्या वारसदारांमध्ये लवत होत आहे या मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान आमदार व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांच्याविरोधात यावेळी काँग्रेसचेच माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील-चाकूरकर या भाजपकडून लढत देत आहेत. या जिल्ह्यात देशमुख चाकूरकर कप्रिय असं काहीसं गणित होतं. चाकूरकर दिल्लीत तर विलासरावांनी राज्यातील राजकारण सांभाळायचं असा अलिखित नियम होता. मात्र २००४ च्या निवडणुकीत चाकूरकरांचा पराभव झाला. या पराभवास विलासरावांचेच कार्यकर्ते जबाबदार असल्याचा ठपका ठेवला गेला. तेव्हापासून दोन्ही कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झाल्या. पुढे विलासराव देशमुखांचे दोन चिरंजीव राजकारणात आले. अमित देशमुख यांनी लातूर शहर तर धीरज देशमुख यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघावर आपली पकड निर्माण केली. चाकूरकर यांचे चिरंजीव बैंड, शैलेश  पाटील-चाकूरकर हे काँग्रेस पक्षात पदाधिकारी होते. मात्र, त्यांच्या कुटुंबातील फोणी बेट निवडणुकीत उत्तरले नवजाते. आता अर्चना पाटील निवडणुकीच्या मैदानात उत्तरल्या आहेत. लातूर ग्रामीण मतदारसंघात विलासरावांचे दुसरे चिरंजीव आमदार धीरज देशमुख यांच्या विरोधात भाजपने विधानपरिषद आमदार रमेश कराड यांना मैदानात उतरवले आहे. तर मनसेकडून संतोष नागरगोजे यांना उमेदवारी दिली आहे. मागच्या निवडणुकीत धीरज देशमुख यांना एक लाख ३५ हज्जार मते मिळाली होती. त्यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार होता. त्या निवडणुकीचे वैशिष्ठ्य म्हणजे २७ हजार ५०० मते नोटाला होती. त्यामुळे नोटा दुसऱ्या क्रमांकावर तर शिवसेना उमेदवार केवळ १३ हजार ५०० मते मिळवून तिसन्या क्रमांकावर होता.

निलंगेकर हॅ‌ट्ट्रिक करत गड राखणार का?

निलंगेकर कुटुंबाचा अभेद्य गढ़ मानात्ता जाणाऱ्या निलंगा मतदारसंघातून संभाजी पाटील-निलंगेकर सलग तिसन्यांदा नशीब अजमावत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने अभय साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे १९७२ पासून काँग्रेसची उमेदवारी निलंगेकर कुटुंबातील सदस्यालाच मिळत गेली आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच निलंगेकर कुटुंबाशिवाय बाहेरच्या कार्यकत्यांला संधी मिळाली आहे. काँग्रेसने तिकीट नाकारलेले अशोकराव पाटील निलंगेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे उमेदवारी मागे घेण्यासाठी गेली आवडावर काँग्रेसचे नेते मंडळी अशोकराव पाटलांना विनवण्या करत होती. अखेर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या  लढत होईल १९७२ पासून २०१९ पर्यंत केवळ १९९५ चा अपवाद वगळता माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांच्या कुटुंबाचाच सदस्य या मतदारसंघातून विजयी इसलेला आहे. १९७२ ते १९८० असे सलग तीन वेळा स्वतः शिवाजीराव पाटील-निलंगेकर या मतदारसंघातून विजयी झाले होते. १९८५ मध्ये त्यांचे चिरंजीव व संभाजी पाटील यांचे वडील दिलीपराव निलंगेकर काँग्रेसकडून विजयी झाले होते. त्यानंतर पुन्हा १९९० आणि १९९९ असे दोन वेळा स्वतः शिवाजीराव पाटील विजयी झाले. त्यांना मधल्या १९९५ च्या निवडणुकीत जनता दलाचे उमेदवार असलेले काँग्रेड माणिकराव जाधव यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. २००४ मध्ये निलंगेकर कुटुंबात मतभेद झाले. त्याचा फायदा घेत भाजपाने शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या स्नुषा रूपाताई दिलीपराव निलंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यांनी माजी केंद्रीय मंत्री  शिवराज पाटील चाकूरकर पांना पराभूत केले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांचे चिरंजीय संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर यांनी भाजपकडून घेट आजोबांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लक्ष्यली, त्या निवडणुकीत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना नातयाकडून जेमतेम दोन हजार 350 मतांनी पराभव स्वीकारावा लागला, २००९ च्या निवडणुकीत पुन्हा आजोबा आणि नातू अशी लढत झाली. त्यावेळी मात्र काँग्रेसचे उमेदवार असलेल्या शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी भाजपचे उमेदवार असलेले यांचे नातू संभाजीराव पाटील यांचा सात हजार ५०४ मतांनी पराभव केला. २०१४ आणि २०१९ घा दोन्नती निवडणुकीत भाजपकडून संभाजी पाटील तर काँग्रेसकडून त्यांचे चुलते अशोकराय पाटील निलंगेकर अशी लढत झाली. या दोन्ही निवडणुकीत संभाजी पाटील विजयी झाले.

आता या निवडणुकीत निलंगेकर विरुद्ध निलंगेकर असा सामना होणार नाही.  यावेळी दोघा भावांना विरोधातील उमेदवार तगडे असल्याने लढत द्यावी लागणार आहे.  चव्हाणांच्या तिसऱ्या पिढीची राजकारणात एन्ट्री माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा राजकीय वारसा तिसन्या पिढीत त्यांची नात व माजी मुख्यमंत्री अशोक पाहाण यांच्या कन्या श्रीजया या निवडणूकीत चालवणार हे स्पष्ट झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील चोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाण या भाजपच्या उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात काँग्रेसने तरण कार्यकर्ता तिरुपती कोडेकर यांना मैदानात उतरवले आहे. तेथे बहुजन वंचित आघाडीने सुरेश राठोड यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात तब्बल १४० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.  त्यापैकी ११५ जणांनी माघार घेतली असल्याने २५  जण रिंगणात असले तरी मुख्य लढत ही काँग्रेस व भाजप यांच्यातच राहील असे मानले जाते. चव्हाण घराण्याच्या तिसन्या पिढीची राजकारणात एन्ट्री होत असल्याने अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. माजी मुख्यमंत्री शंकरराय गव्हाण हे हैद्राबाद मुक्तीसंग्रामापासून मराठवाडयात सक्रिय होते. मराठवाडा महाराष्ट्राला जोडला गेल्यानंतर ते  प्रथम राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले. त्यानंतर अनेक वर्ष आमदार, खासदार, राज्यात व केंद्रात मंत्री त्याचबरोबर दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राचा कारभार सांभाळला, त्यांच्या काळात मराठवाडयातील जायकवाडी, विष्णुपुरी इसापूर, मनार, सिद्धेश्वर, येलदरी, दुधना, अप्पर पैनगंगा, मांजरा, पूर्ण अशा किती प्रकल्पांच्या उभारणीत त्यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे. पुढे त्यांचा राजकीय वारसा त्यांचे चिरंजीव अशोकराव चव्हाण यांनी चालवला. त्यांनीही आमदार, खासदार तसेच राज्य मंत्रीमंडळात विविध खाती सांभाळली. तेही दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. चव्हाण घराणे हे 1948 पासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेलं  मराठवाडयातील घराणं महणून ओळखलं  जात होते. २०१४ च्या मोदी लाटेमध्येही अशोक चव्वाण पांनी नांदेडनी जागा जिंकली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या भोकर मतदारसंघातून त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण विजयी झाल्या होत्या.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या वेळी लावण्यात आलेल्या पोस्टरवरती श्रीजया चव्हाण यांचे फोटो झळकले होते. तेव्हाच श्रीजया यांची वारसदार माणून राजकारणात एन्ट्री होणार असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून श्री. चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते स्वतः भोकरमधून निवडून आले. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने लागलीच त्यांना राज्यसभेवर संधी दिली. त्यामुळे आता त्यांनी भोकर मतदारसंघातून कन्या श्रीजया यांच्यासाठी भाजपकडून तिकीट मिळवले आहे.  श्री. गव्हाण यांनी पक्ष बदलल्यामुळे नांदेड जिल्ह्यात काँग्रेस व भाजपमध्ये अनेक घडामोडी पहल्या. अशोक चव्हाण आल्यामुळे पक्षाला फायदा होईल असे भाजप नेत्यांना वाटत होते. मात्र, त्यांचे कट्टर विरोधक असलेले प्रताप पाटील-भिखलीकर नाराज झाले होते. विद्यमान खासदार असल्याने भाजपने त्यांना पुन्हा तिकीट दिले. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या कार्यकत्यांनी पराभवाचा दोष श्री चकाण यांच्यावर ठेवला. अखेर नाराज चिखलीकर पांनी भाजपला रामराम ठोकला. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कविसमध्ये प्रवेश करून लोहा मतदारसंघातून आता ते निवडणूक लढवत आहेत. या सर्व पाश्र्वभूमीवर श्री चव्हाण यांना मुलीला निवडून आणण्यासाठी स्वतःची सर्व प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00