Home » Blog » शिवेंद्रसिंहराजे-कदम यांच्यातच लढाई

शिवेंद्रसिंहराजे-कदम यांच्यातच लढाई

शिवेंद्रसिंहराजे-कदम यांच्यातच लढाई

by प्रतिनिधी
0 comments
Satara file photo

दत्तात्रय पवार; सातारा-जावळी : राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात अखेर बंडोबा थंड झाले असून, मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. येथे आमदार शिवेंद्रराजे भोसले व अमित कदम यांच्यातच खरी लढत होणार आहे.

शिवेंद्रसिंहराजेंच्या विकासात्मक राजकारणाविरुद्ध जी. जी. अण्णांचा विचार घेऊन अमित कदम हे राजकारणाची लढाई लढणार आहेत. इतर काही उमेदवार रिंगणात आहेत, मात्र मतदानात फारशी आघाडी घेता येणे शक्य नाही. दोन्ही बाजूला कार्यकर्त्यांची फळी भक्कम असल्यामुळे दोन्ही उमेदवारांचा कस लागणार आहे.

या विधानसभा मतदारसंघात अर्ज दाखल केल्यापासून माघार घेईपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेचे एस. एस. पार्टे यांनी लढणारच असा निर्धार करत अर्ज भरला आणि माघारीदेखील घेतला. तसेच रिपाइं गटाचे धोत्रे, दादा ओव्हाळ यांच्यासह एकनाथ शिंदे गटाचे प्रशांत तरडे यांनी अर्ज माघार घेतल्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे.

सध्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नाराज कार्यकर्ते एकत्र करून बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. मात्र लोकसभेला एका गटात, तर विधानसभेला दुसऱ्या गटात दिसणाऱ्या या कार्यकर्त्यांमुळे शिवेंद्रसिंहराजेंना मतदानात फटका बसू शकतो. त्यामुळे त्यांनी सोबत घेतलेल्या काही कार्यकर्त्यांकडून  त्यांना किती मताधिक्य मिळणार हे मतदानानंतर दिसून येईल. महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांनी संपूर्ण शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तसेच काँग्रेस या सर्वांना एकसंध करून प्रचारात उतरवले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी अमित कदम यांच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे विकासकामांच्या जोरावर, तर अमित कदम हे घराण्याच्या वैचारिक वारसा घेऊन ही निवडणूक लढवत आहेत.

राष्ट्रवादीचे दीपक पवार नाराज

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला शरद पवार पक्षाचे नेते दीपक पवार यांना उमेदवार निवडी वेळी विश्वासात घेतले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी चार नोव्हेंबरला मेढ्यात मेळावा घेऊन नोटाला मतदान करण्याची भूमिका घेतली. या निवडणुकीत एकही उमेदवार पसंत नसल्याचे दीपक पवार यांनी सांगितले आहे.

मोहितेंचे आंदोलने ठरणार फायदेशीर

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सचिन मोहिते यांनी आतापर्यंत जनसामान्यांचे प्रश्‍न घेऊन विविध आंदोलने केली आहेत. सर्वसामान्य, पीडित तसेच अन्यायग्रस्त घटकांच्यासाठी अनेकदा ही आंदोलने झाली. त्यामुळे मोहिते यांची साथ कदम यांना आहे. या आंदोलनांचा फायदा अमित कदम यांना होऊ शकतो.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00