मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना १ नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडने बंगळुरू आणि पुणे कसोटीत विजय मिळवत मालिका २-०ने आपल्या खिशात घातली आहे. मुंबई कसोटीत टीम इंडिया व्हॉईट वॉश टाळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर, न्यूझीलंड संघ ऐतिहासिक कामगिरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विल्यिमसन दुखापतीमुळे दोन कसोटी सामन्यात खेळला नव्हता. परंतु, मालिकेतील शेवटच्या तो सामन्यात खेळेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु, तंदुरुस्त नसल्यामुळे केनला मुंबई कसोटीत विश्रांती दिल्याची माहिती न्यूझीलंडच्या संघ व्यवस्थापनाने दिली आहे. (Kane Williamson)
केन विल्यमसन पाठीच्या दुखापतीतून बरा झालेला नाही. यामुळे तो मुंबई कसोटीत खेळणार नाही. भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडने बंगळुरू आणि पुणे कसोटीत विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघाची २०१२ पासून घरच्या मैदानावर १८ मालिका जिंकण्याची घौडदौड न्यूझीलंडने रोखली आहे. यासह त्यांनी भारतात पहिलीच कसोटी मालिका जिंकली आहे. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले की, “केनच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. परंतु, तो पुर्णपणे तंदुरूस्त नसल्याने आम्ही त्याला मुंबईत कसोटी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
स्टेड पुढे म्हणाले की, इंग्लंडविरूद्घच्या सामन्यात केनने खेळणे आम्हाला महत्वाचे वाटते. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी क्राइस्टचर्च येथे खेळवली जाणार आहे. स्टेड म्हणाले की, ‘इंग्लंड मालिकेला अजून एक महिना बाकी आहे. या दरम्यान तो पुर्णपणे तंदुरूस्त होईल.
हेही वाचा :
- मॅथ्यू वेडची क्रिकेटमधून निवृत्ती
- अग्नी चोप्राची द्विशतकी खेळी
- आयसीसी वन-डे क्रमवारीत दीप्ती शर्माची दुसऱ्या स्थानावर झेप