महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारतीय संघ पुढील महिन्यात चार सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. काल (दि.२५) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाची घोषणा केली. द. आफ्रिका दौऱ्यासाठी कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. भारतीय संघाचा हा दौरा ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने युवा खेळाडूंना संघात संधी दिली आहे. (SA vs IND)
संघात युवा खेळाडूंना संधी
द. आफ्रिकाविरूद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी अनुभवी हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन यांच्यासह तिलक वर्मा, रिंकू सिंग, रमणदीप सिंग आणि विजयकुमार विशाक या खेळाडूंचा समावेश आहे. भारताने बांगला देशविरुद्ध शानदार विजय नोंदवला होता. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयाची नोंद करण्याचे लक्ष्य संघाचे आहे. देशांतर्गत क्रिकेट, आयपीएल आणि भारत अ संघात छाप पाडल्यानंतर रमणदीप सिंग आणि विजयकुमार विशाक यांना टी-२० आंतरराष्ट्रीय संघात स्थान दिले आहे.
मयांक, शिवम ‘आऊट’
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार दुखापत झाल्यामुळे मयांक अग्रवालची संघात निवड करण्यात आलेली नाही. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेत मयंकने चांगली कामगिरी केली होती. मयांकशिवाय भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेही दुखापतीमुळे दौऱ्याला मुकणार आहे. तर, रियान पराग सध्या खांद्याच्या दुखापतीवर NCA मध्ये उपचार घेत आहेत. (SA vs IND)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार T20 सामन्यांसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती , रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशाक, आवेश खान, यश दयाल.
🚨 NEWS 🚨
Squads for India’s tour of South Africa & Border-Gavaskar Trophy announced 🔽#TeamIndia | #SAvIND | #AUSvIND pic.twitter.com/Z4eTXlH3u0
— BCCI (@BCCI) October 25, 2024
हेही वाचा :
- बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर
- शिरोळ मधून गणपतराव पाटील कॉंग्रेसचे उमेदवार
- ‘सेबी’च्या प्रमुख माधवी बुच चौकशीला गैरहजर