Home » Blog » दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे WTC गुणतालिकेत बदल

दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे WTC गुणतालिकेत बदल

WTC 2025 : कसे आहे भारतीय संघाचे समीकरण?

by प्रतिनिधी
0 comments
WTC 2025 file photo

महाराष्ट्र दिनमान  ऑनलाईन डेस्क : बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना मीरपूरच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर झाला. या कसोटी सामन्यात द. आफ्रिकेने बांगला देशचा सात विकेट राखून पराभव केला. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बदला झाला आहे. (WTC 2025)

दक्षिण आफ्रिका ‘इन’ बांगला देश ‘आऊट’

बांगला देशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यामुळे द. आफ्रिकेचा मोठा फायदा झाला आहे. या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आफ्रिकन संघ चौथ्या स्थानी पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेची गुणांची टक्केवारी (PCT) ४७.६२ झाली आहे. आफ्रिकन संघाने गुणतालिकेत न्यूझीलंड (४४.४४) आणि इंग्लंड (४३.०६) यांना मागे टाकले आहे. दुसरीकडे, या पराभवानंतरही, बांगलादेश संघ WTC टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे.

पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवामुळे बांगला देश संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर दक्षिण आफ्रिकन संघाला आणखी पाच सामने खेळायचे आहेत. यापैकी चार सामन्यात विजय मिळवल्यास त्यांना पुढच्या वर्षी लॉड्सवर होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळण्याची शक्यता आहे.

कसे आहे भारतीय संघाचे समीकरण?

भारतीय संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघाकडे १२ सामन्यांतील ८ विजय, ३ पराभव आणि १ ड्रॉसह ९८ गुण आहेत. त्याच्या गुणांची टक्केवारी ६८.०६ आहे. सध्या भारताला आणखी ६ सामने खेळायचे आहेत. भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये पाच कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी ती न्यूझीलंडविरुद्ध मुंबई येथे कसोटी खेळायची आहे. सध्या न्यूझीलंड आणि भारत यांच्या पुणे कसोटी सुरू आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला सातपैकी किमान ३ सामने जिंकणे गरजेचे आहे. भारतीय संघाने सातपैकी चार सामन्यांत विजय मिळवल्यास भारतीय संघाचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. मात्र, सातपैकी ३ कसोटीत विजय मिळवल्यास भारताला दुसऱ्या संघाच्या विजयावर अवलंबून राहावे लागणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचे १२ सामन्यांत ८ विजय, ३ पराभव आणि एक अनिर्णित असे ९० गुण आहेत. त्याच्या गुणांची टक्केवारी ६२.५० आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचे नऊ सामन्यांमध्ये ६० गुण आहेत. त्याची टक्केवारी ५५.५६ टक्के इतकी आहे. तर, दक्षिण आफ्रिका चौथ्या, न्यूझीलंड पाचव्या आणि इंग्लंड सहाव्या स्थानावर आहे.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00