Home » Blog » “ऐनवेळी अन्य नाव येवू शकते” काँग्रेस निरीक्षकांच्या अंदाजाने दिवसभर रंगली चर्चा

“ऐनवेळी अन्य नाव येवू शकते” काँग्रेस निरीक्षकांच्या अंदाजाने दिवसभर रंगली चर्चा

Maharashtra Election : इच्छुक उमेदवारांच्या काँग्रेसकडून मुलाखती

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Election

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याचा अंदाज आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी मी आलो आहे. कार्यकर्त्यांशी बोलून मतदारसंघातील परिस्थितीचा अंदाज घेणार असून यातून जर काही नावे राहिली तर ऐनवेळी अन्य नाव येवू शकते’ अशी शक्यता काँग्रेस पक्ष निरीक्षक लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. चांगला आणि योग्य उमेदवार देऊन काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणणे, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणयाचा आमचा प्रयत्न सुरु आहे, असेही डॉ. काळगे यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Election)

स्टेशन रोडवरील जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आज (दि.१९) पक्ष निरीक्षक लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे आणि त्यांच्यासमवेत आंध्रप्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. साके सैलजानाथ यांनी दुपारी जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील, शाहुवाडीतून गोकुळचे संचालक अमर पाटील, आणि शिरोळ मतदारसंघातून दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी मुलाखत दिली. उत्तर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार जयश्री जाधव यांच्यासह आठ उमेदवारांनी मुलाखत दिली. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती असल्याने त्यांच्या समवेत कार्यकर्त्यानीही मोठी गर्दी केली होती.

ऐनवेळी राहिलेले नाव पुढे येवू शकते असे निरीक्षक यांनी पत्रकारांना सांगितल्यामुळे उत्तर मतदारसंघात कोण ? अशी चर्चा काँग्रेस कार्यालयात रंगली होती. त्यामध्ये प्रामुख्याने विधानपरिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती यांच्या स्नुषा मधुरिमाराजे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. (Maharashtra Election)

मतदार संघ आणि उमेदवार

कोल्हापूर उत्तर

  • आमदार जयश्री जाधव
  • माजी स्थायी सभापती शारंगधर देशमुख
  • माजी स्थायी सभापती राजू लाटकर
  • माजी स्थायी सभापती सचिन चव्हाण
  • माजी स्थायी सभापती आर.डी.पाटील
  • माजी नगरसेवक आनंद माने
  • अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक
  • सामाजिक कार्यकर्ते दुर्वास कदम

कोल्हापूर दक्षिण

  • आमदार ऋतुराज पाटील

करवीर

  • माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील
  • कॅप्टन उत्तम पाटील

कागल

  • सागर कोंडेकर,
  • अॅड. दिग्विजय कुऱ्हाडे

राधानगरी

  • गोकुळचे संचालक राजेंद्र मोरे
  • सचिन घोरपडे
  • माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील

शाहुवाडी

  • गोकुळचे संचालक अमर पाटील
  • जिल्हा परिषद माजी सदस्य सुभाषराव इनामदार

हातकंणगले

  • आमदार राजू जयवंतराव आवळे
  • तुकाराम कांबळे

इचलकरंजी

  • माजी नगरसेवक संजय कांबळे
  • संजय तेलनाडे
  • राहुल खंजिरे

शिरोळ

  • दत्तचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील

चंदगड

  • गोपाळराव पाटील
  • जिल्हा बँक माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील
  • प्रा. किसनराव कुराडे
  • बाबासो उर्फ सोमगोंडा अरबोले
  • विद्याधर गुरबे

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00