महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) येथे तब्बल ७२ जागांसाठी प्राध्यापक भरती होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ ला राज्यातील विविध १५ अकृषी विद्यापीठे आणि शासनमान्य अभिमत विद्यापीठांमधील शिक्षक, शिक्षक समकक्ष अशा ६५९ पदांच्या भरतीला मान्यता दिली होती. यामध्ये कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात (Shivaji University) येणाऱ्या ७२ पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून, भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
तब्बल ७२ जागांसाठी प्राध्यापक भरती
शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) येथे तब्बल ७२ जागांसाठी प्राध्यापक भरती होणार आहे. भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी करावयाचे अर्ज हे ११ नोव्हेंबरपर्यंत मागवण्यात आले असून, त्याबद्दलची माहिती अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे. शिवाजी विद्यापीठ ही भरती एकूण ६२ सहाय्य्क प्राध्यापक पदांसाठी तर १० सहयोगी प्राध्यापक पदांसाठी करणार आहे. तर या पदांचे विभाजन हे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ४३ जागा, प्रशिक्षक पदासाठी २ जागा , प्रकल्प अधिकारी ०१ जागा तर सहाय्यक संचालक / सहाय्यक प्राध्यापक पदासाठी १६ जागा अशा पद्धतीने केले आहे.
Shivaji University : अर्ज कसा करावा?
भरतीसाठीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, पदभरती हे पात्रांच्या पात्रतानिकषांनुसार केली जाणार आहे. यासंदभातील अधिकची माहिती शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अर्जदारांनी अर्ज करताना स्वतःचे नाव, रहिवासी पत्ता, ईमेल-आयडी, मोबाईल क्रमांक अशी सर्व प्रकारची माहिती देणे बंधनकारक आहे. अर्जदारांनी अर्जाच्या सहा हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक असून, त्यासाठीची शेवटची तारीख ही २५ नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजूपर्यंत आहे. ही प्रत शिवाजी विद्यापीठाच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. यानंतर मिळालेल्या सर्व अर्जाची छाननी करून काही निवडक उमेदवाराना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. यासंदर्भतल्या सर्व माहिती वेळोवेळी शिवाजी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
हेही वाचा
- शिवाजी विद्यापीठाचा ‘नॅसकॉम’समवेत सामंजस्य करार
- डी. वाय. पाटील कृषी-तंत्र विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात
- वस्त्रोद्योगातील प्रदूषक रंगद्रव्यांपासून पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती
- अंबाबाई मंदिरातील गर्दीला ‘विधानसभे’ची झालर