Home » Blog » कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या १०२ जागांसाठी भरती

कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या १०२ जागांसाठी भरती

Medical College : कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या १०२ जागांसाठी भरती

by प्रतिनिधी
0 comments
Medical College File Photo

कोल्हापूर; प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविदयालय कोल्हापूर (GMC) मध्ये विविध पदांसाठी १०२ जागांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी अधिसूचना शासनाकडून जारी करण्यात आली आहे. महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रयोगशाळांसाठी प्रयोगशाळा परिचर, शिपाई, मदतनीस. क्ष- किरण विभागासाठी क्ष-किरण परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक, बाह्यरूग्ण सेवक, कक्ष सेवक अशा विविध १०२ पदांसाठीची भरती केली जाणार आहे.या पदासाठीची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या शैक्षणिक पात्रतांनुसार असून त्यासाठीची जाहिरात https://rcsmgmc.ac.in/ या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. (Medical College)

अर्ज प्रक्रिया

खुल्या प्रगर्वातील उमेदवारांना वयाची अट ही किमान १८ वर्षे पूर्ण ते ३८ वर्ष अशी आहे. तर खुला प्रवर्ग वगळता इतर उमेदवारांना वयाची अट ही १८ वर्षे ते ४३ वर्षे अशी आहे. तसेच खुल्या वर्गासाठी एक हजार रुपये शुल्क तर राखीव वर्गासाठी ते ९०० रुपये आहे.पात्र उमेदवारांना २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना अर्जातील नावाचा पुरावा, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, वयाचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, भुकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा आवश्यक आहे. (Medical College)

अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असून ती वरील सर्व पदांसाठी आहे. अर्जदारांनी अर्ज हे अधिकृत संकेतस्थळावर अर्जाच्या शेवटच्या तारखे अगोदर सादर करणे आवश्यक आहे. अर्जदारांनी अर्जा सोबत पदांसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. जर कोणत्याही अर्जदाराचे कागदपत्रे नीट पूर्तता झाली नसल्यास त्याचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. अधिक माहिती साठी https://rcsmgmc.ac.in/sites/default/files/2024-10/Adobe%20Scan%2011-Oct-2024.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00