Home » Blog » तिसरी आघाडी, मनसेचा कोणाला होणार फायदा?

तिसरी आघाडी, मनसेचा कोणाला होणार फायदा?

Maharashtra Asselmbly Election : राज्यात दुहेरीच लढती

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Government file photo

जमीर काझी

मुंबई : अखेर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजला असून राजकीय रणधुमाळी उडणार आहे. सत्तारूढ महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी यांच्यातच प्रामुख्याने दुहेरी लढत होणार आहे. त्याचबरोबर तिसरी आघाडी आणि मनसेचे उमेदवार स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार आहेत. त्यांचा कोणाला फायदा होईल ?आणि दोन्ही आघाडीतील बंडखोरीचा फटका कोणाला बसेल ? यावर सत्तेचा लंबक अवलंबून राहणार आहे. (Maharashtra Asselmbly Election)

सत्तारूढ महायुती सरकारने गेल्या महिन्याभरापासून  एका आठवड्यात दोन दोन वेळा मंत्रिमंडळाच्या बैठका घेत निर्णयांचा धडाका लावला. त्यामध्ये विविध समाज आणि घटकांसाठी महामंडळे, मुंबईतील प्रवेशासाठी टोलमाफी हे महत्त्वाचे निर्णय घेतले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची दुरवस्था आणि वाढत्या गुन्हेगारीबाबत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. त्यामुळे निवडणुकीत हे सर्व मुद्दे प्रचाराचा भाग ठरणार आहेत. आरोप-प्रत्यारोपामुळे रणधुमाळी माजणार आहे. सत्तारूढ महायुतीतील भाजपा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे तर महाविकास आघाडीत काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तसेच समाजवादी आणि शेकापचा समावेश असणार आहे. (Maharashtra Asselmbly Election)

जागावाटप एकमताने होणार असून आमच्यात कोणताही वाद नसल्याचे आघाडीतील नेते वारंवार सांगत आहेत. मात्र अद्याप त्यांच्यामध्ये जागावाटपाचा फॉर्मुला निश्चित झालेला नाही. दोन्हीकडील प्रमुख सहा पक्ष आपल्याकडे जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, यासाठी आग्रही आहेत त्यामुळे त्यांच्यातील जवळपास ५० ते ६० जागेवरील वाद अद्याप मिटलेला नाही. येत्या काही दिवसात त्यांच्यात बैठका होऊन जागावाटप निश्चित केले जाईल मात्र तरीही दोन्हीकडे तिकीट न मिळाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये  बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे.

याव्यतिरिक्त माजी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य पक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांचा प्रहार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्र येत तिसरी आघाडी बनवली आहे. या आघाडीत अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अद्याप त्यांना यश आलेले नाही. तसेच लोकसभा निवडणुकीत वेळी भाजप व महायुतीला ‘बिन शर्ट’ पाठिंबा दिलेल्या मनसेने आता स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून उमेदवारही रिंगणात असणार आहेत.  त्याचा कोणाला फटका बसेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

निवडणुकीत महत्त्वाचे ठरणारे मुद्दे

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
  • भूमिगत मेट्रोसह विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन व भूमिपूजन
  • मुंबईत वाहनांना टोलमुक्ती
  • विविध समाज व घटकांसाठीचे महामंडळांची घोषणा
  • मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलन
  • राज्यातील वाढते गुन्हेगारी
  • महिलांवरील वाढते अत्याचार
  • विविध प्रकल्पात झालेला भ्रष्टाचार

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00