मुंबई; विशेष प्रतिनिधी : देशात राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला उत्तर प्रदेशातून एकाला अटक केली आहे. हरिकुमार बलराम (२३ रा. बहराईच उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव असून त्याचे पुण्यात भंगार गोळा करण्याचा दुकान काम करत होता. (Baba Siddiqui murder case)
रविवारी रात्री झालेल्या या हत्याकांडात आतापर्यंत गोळीबार करणाऱ्या प्रत्यक्ष दोघा हल्लेखोरासह एकुण ४ जणांना आतापर्यंत अटक झाली आहे. मात्र हल्याची जबाबदारी सोशल मीडियावर पोस्ट करुन स्वीकारणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीतील संशयित आरोपी शुभम लोणकरचा पत्ता लावता आलेला नाही. तर त्याचा भाऊ प्रवीण लोणकरला (२८) अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांचे १५ पथके तैनात केली आहेत. दरम्यान, या संशयित आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या संशयित आरोपींकडून दोन पिस्तुल आणि २८ काडतुसे जप्त केली आहेत. अटक केलेल्या तिघा जणांना २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा :