Home » Blog » ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड

by प्रतिनिधी
0 comments
Atul Parchure

मुंबई;  प्रतिनिधी : मराठी चित्रपट सृष्टीतील विविधांगी भूमिका लीलया साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे (वय ५७) यांचे आज (दि.१४) निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  त्यांच्या पश्चात्त आई, पत्नी आणि प्रख्यात नृत्यदिग्दर्शक सोनिया परचुरे आणि मुलगी असा परिवार आहे.

अतुल परचुरे यांनी चित्रपटांसह अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांमधूनही विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकीर्द सुरु करणाऱ्या अतुल परचुरे यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवली. नाटक, सिनेमा, मालिकांतून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. परंतु, मध्यंतरी सारे काही सुरळीत सुरु असताना त्यांना कर्करोगासारख्या असाध्य आजाराला सामोरे जावे लागले. हा मधला काळ त्यांच्यासाठी प्रचंड जोखमीचा आणि कठीण होता. चुकीच्या सल्ल्यामुळे त्यांचा कर्करोग आणखीनच बळावला होता. पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती. पुन्हा शूटिंगला सुरुवातही केली होती. आज त्यांचे निधन झाले.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00