Home » Blog » स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी!

स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी!

वडील सुरेश कुसाळेंच्या नाराजीनंतर मोठी घोषणा

by प्रतिनिधी
0 comments
Swapnil Kusale

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्य सरकारने कोल्हापूरच्या ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला दोन कोटी रुपयाचा धनादेश सोपवला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केल्यानंतर आज राज्य सरकारने तातडीने दोन कोटींचा धनादेश दिला आहे. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने दमदार कामगिरी करून नेमबाजीत कांस्य पदक पटकावून देशाचे नाव उंचावले होते. (Swapnil Kusale)

वडील सुरेश कुसाळे यांची पत्रकार परिषद..

स्वप्निलचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जमीन, दागिने विकले. आता त्याचे पुढील ध्येय २०२८ मधील ऑलिम्पिक स्पर्धेचे असून,त्याला सुवर्ण पदक जिंकायचे आहे. सध्या सरकारने कांस्यपदक विजेत्यांसाठी १ कोटी रुपये जाहीर केले आहेत. मात्र, खेळाचा खर्च पाहता ही रक्कम तोकडी आहे. भविष्यातील करिअरसाठी सरकारने स्वप्निलला मोठे आर्थिक पाठबळ द्यावे. राज्य सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगून वडील सुरेश कुसाळे पुढे म्हणाले, त्याच्या बाबतीत दुजाभाव केला जात आहे. त्याला बालेवाडीत फ्लॅटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, राज्य सरकारने किमान पाच कोटी रुपये जाहीर करावे.याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी स्वप्निलचे सुरेश कुसाळे यांनी केली होती.

अजित पवारांनी दिल्या शुभेच्छा

अजित पवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात उत्तम कामगिरी करीत स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक जिंकले. यानिमित्ताने अभिनंदनपर स्वप्निलला राज्य सरकारच्या वतीने २ कोटी रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. (Swapnil Kusale)

कोल्हापूरच्या कांबळवाडीचा स्वप्नील कुसाळे

स्वप्नील कुसाळे हा कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी या गावचा असून या तरुणाने आपल्या मेहनतीच्या जोरावर ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली. महाराष्ट्रातून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने पन्नास लाखांची मदत केली होती. स्वप्नील पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सराव करत असे. ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरल्यानंतर तो दिल्ली येथील रेंजवर सरावासाठी गेला होता. स्वप्नील आपल्या सर्वोत्तम खेळांचे चांगले प्रदर्शन करून देशासाठी सुवर्ण पदक मिळवून देईल याची आम्हाला खात्री आहे असे उद्गार वडिल सुरेश कुसाळे (सर) व आई सरपंच अनिता सुरेश कुसाळे यांनी सांगितले होते.मात्र, स्वप्निलला सोनेरी कामगिरी करता आली नसली तरी त्याने ऐतिहासिक कामगिरी केली. स्वप्निलच्या या यशाने कांबळवाडीचे गाव सर्वदूर पसरले.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00