Home » Blog » भाजीपाला संघ स्थापनेसाठी अग्रेसर राहू

भाजीपाला संघ स्थापनेसाठी अग्रेसर राहू

`दत्त शिरोळ`च्या ५३ व्या बॉयलर प्रदीपन समारंभात गणपतराव पाटील यांची ग्वाही

by प्रतिनिधी
0 comments

जयसिंगपूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात सोळा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस दत्त कारखान्याला घालावा, असे आवाहन अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी ५३व्या गळीत हंगाम बॉयलर प्रदीपन प्रसंगी केले. शेतकऱ्यांचे व कामगारांचे हित जपण्याचे काम श्री दत्त कारखान्याने केले असून सर्वांना पुढे घेऊन जाण्याची दृष्टी ठेवली आहे. लवकरच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची संस्था स्थापन करून मार्केटिंग आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही यावेळी उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.

प्रारंभी अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी सपत्निक पूजा केली. तसेच मान्यवरांच्या हस्ते पूजाविधी आणि बॉयलर प्रदीपन करण्यात आले.

गणपतराव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्याबरोबरच सेंद्रीय कर्ब वाढवून जमीन शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. पूरबुडित क्षेत्रात उसापेक्षा भाजीपाल्याची दोन पिके घेतल्यास उसाइतके उत्पन्न शेतकरी घेऊ शकतात. यादृष्टीने कारखाना सध्या काम करीत आहे. भाजीपाला उत्पादकांनी एकत्र येऊन पूरबुड नुकसानीवर मार्ग काढू शकतात. सर्व ती मदत करण्यास कारखाना पुढे राहील. सरकारी नियमानुसार वेळेत बिल देणे आणि सोळा लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यामध्ये कारखाना सक्षम आहे. कारखानदारी सक्षमपणे चालवण्याची आमची दृष्टी आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला घालावा.

यावेळी कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील आणि शेतकरी सभासदांनी दत्त कारखान्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांनी आभार मानले. यावेळी सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे सर्व विभागाचे खातेप्रमुख, पदाधिकारी, मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रातील १२ लाख शेतकऱ्यांना शून्य वीजबिल
राजू शेट्टी झाले मुंबईकर

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00