Home » Blog » आनंदाचा व मांगल्याचा सण : विजयादशमी दसरा

आनंदाचा व मांगल्याचा सण : विजयादशमी दसरा

Dussehra 2024 : अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्याचा दिवस

by प्रतिनिधी
0 comments
Dussehra 2024

कृष्णात चौगले, कोल्हापूर : भारतीय संस्कृतीत अनेक सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दरवर्षी अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसानंतरचा शेवटचा दिवस म्हणजे विजयादशमी. विजय याचा अर्थ जिंकणे आणि दशमी चा अर्थ दहावा म्हणून विजयादशमी. या दिवशी रावण दहन आणि सरस्वती पूजन, शस्त्रपूजा केली जाते. दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे. (Dussehra 2024 )

अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्याचा दिवस म्हणजे विजयादशमी

अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्याचा दिवस म्हणजे विजयादशमी. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. धनसंपदा (महालक्ष्मी), शक्ती (महाकाली), ज्ञानसंपदा (महासरस्वती) या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्रौत्सवात बसविलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते.

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. तर उत्तर भारतामध्ये दसऱ्याला आणि विजया दशमीचा सणाला रामलीला सादर केली जाते. यामध्ये रावणाचा पुतळा उभारून त्याचे दहन केले जाते. या दहनामागे समाजातील आणि सर्वांच्या मनातील वाईट विचार, सवयी यांचा नाश व्हावा अशी अपेक्षा असते.

दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी नवं पीक घरात घेऊन येतात

पूर्वीच्या काळी योद्धे महत्त्वाच्या लढाईसाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर निघत होते. अनेक व्यापारी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर विदेशात जाऊन व्यापार करायचे. यामुळेच दसऱ्याला सीमोल्लंघनाचा दिवस म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली. दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी नवं पीक घरात घेऊन येतात. देवीने दानवांचा वध करून धर्म आणि देवांचे रक्षण केले होते, तर प्रभू श्रीरामानेही धर्माच्या रक्षणासाठी रावणाचा वध केला होता. म्हणून या दिवशी देवी आणि भगवान श्रीराम यांच्या शस्त्रांची पूजा केली जाते.

शस्त्र पूजा का केली जाते…

हा सण शस्त्राने देशाच्या सीमेची रक्षा करणारे तसेच कायद्याचे रक्षण करणारे किंवा शस्त्राचा इतर चांगल्या कामासाठी वापर करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या दिवशी हे सर्वजण आपापल्या शस्त्रांची पूजा करतात, कारण हे शस्त्र प्राणांची रक्षा करतात तसेच भरण पोषणाचे साधनही आहेत. फ्ग्फ्ग

Dussehra 2024 :सोने म्हणून आपट्याची पाने

महाभारतानुसार, पांडवांना १३ वर्षे वनवास आणि १ वर्ष अज्ञातवासात पाठवण्यात आले होते. हा वनवास सुरु करण्याआधी त्यांनी आपली शस्त्रे शमी वृक्षाच्या झाडावर ठेवली होती. अर्जुनाने ही शस्त्रे विजयादशमी (दसरा) च्या दिवशी परत आणली. यानंतर त्यांनी युद्धाची तयारी सुरू केली आणि कुरुक्षेत्राचा विजय मिळवला. पांडव विजयादशमीला पुन्हा परत आले, म्हणूनच एक नवीन काम सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने वाटली जातात. या पानांचे औषधी गुणधर्म आहेत.

या पानांचे शास्त्रीय नाव – महाराष्ट्रात आपट्याची पाने दसऱ्याला वाटप करतात.पानांची देवाणघेवाण करतात, त्यांना सोनं म्हणतात. जे सोन्याचे प्रतीक आहे. त्याच्या इतर नावांमध्ये सोनपट्टा आणि सोन्याची पाने समाविष्ट आहेत. हृदयाच्या आकाराच्या या पानाचे वैज्ञानिक नाव बौहिनिया रेसमोसा असे आहे.

पौराणिक कथेनुसार, मराठा सैनिक युद्धातून सोने आणि इतर प्रकारची संपत्ती घेऊन परतत असत. ते देवतांच्या मूर्तींना युद्धाचा खजिना अर्पण करायचे आणि आपल्या प्रियजनांना द्यायचे. सोने खूप महाग असल्याने या प्रथेची आठवण करून देण्यासाठी लोक आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करू लागले. योद्ध्यांनी वाटून घेतलेले सोने हे आपट्याच्या पानांचे प्रतीक बनले.

Dussehra 2024 : आपट्याच्या पानाचे आरोग्यदायी फायदे

एका संशोधनात असे आढळून आले आहे की, आपट्याची पाने बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संक्रमणाशी लढण्यास मदत करतात. या पानांच्या अर्कामध्ये विविध जीवाणू आणि बुरशीजन्य संक्रमणांशी लढण्यासाठी प्रतिजैविक आणि अँटीऑक्सिडंट प्रभाव असतो. हे बॅसिलस सबटिलिसच्या वाढीस प्रतिबंध करते आणि कॅन्डिडा अल्बिकन्स विरुद्ध लढते आणि म्हणूनच बुरशीजन्य संसर्गाच्या उपचारांमध्ये वापरले जाऊ शकते. अस्थमा बरा होतो

बौहिनिया रेसमोसाची पाने त्यांच्या अँटीहिस्टामिनिक प्रभावामुळे पारंपारिकपणे दम्याच्या उपचारांमध्ये वापरली जातात. अस्था असलेल्या लोकांनी आपट्याच्या पानांचे ज्यूस प्यावे. तसेच आपट्याची पाने मधुमेहावरील शक्तिशाली हर्बल औषधाच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकतात, असे एका अभ्यासात नमूद केले आहे. मधुमेहाशी लढण्यास मदत करतात: पानांच्या अर्कामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करून मधुमेह प्रतिबंधक क्रिया लक्षणीय असते. हे ऍडिपोज टिश्यू आणि लिपिड पातळी देखील सामान्य करते. त्याच्या संभाव्यतेमुळे, हे मधुमेह आणि लठ्ठपणासारख्या संबंधित गुंतागुंतांवर उपचार करण्यासाठी एक प्रभावी औषध असू शकते. सीरम ट्रायग्लिसराइड्स, एकूण कोलेस्टेरॉल, एलडीएल आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवून लिपिड प्रोफाइल सुधारते.

हेही वाचा 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00