19
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वरळी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत पारशी समाजाच्या विधीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्याकरता देशभरातील असंख्य लोक मुंबईत दाखल झाले होते. (Ratan Tata)
अंत्यसंस्कारापूर्वी रतन टाटा यांचे पार्थिव नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीतील स्मशानभूमीत नेण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी रतन टाटा यांच्या सावत्र आई सिमोन टाटा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री पियुष गोयल, इतर मंत्री आणि उद्योग जगातातील दिग्गज उपस्थित होते.
हेही वाचा :
- राफेल नदालचा टेनिसला अलविदा; जाहीर केली निवृत्ती
- हॅरी ब्रुकने सेहवागचा विक्रम मोडला; बनला ‘मुलतान’चा नवा ‘सुलतान’!
- जे करायला विराटने सहा वर्षे लावली, तेच रूटने आठ महिन्यात केलं!