Home » Blog » पंतप्रधान मोदींनी लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद

पंतप्रधान मोदींनी लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद

by प्रतिनिधी
0 comments
Prime Minister Modi enjoyed playing football

नवी दिल्ली : सिक्कीमच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्थानिक तरुणांबरोबर फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. पश्चिम बंगालमध्ये फुटबॉल लोकप्रिय खेळ असून उद्या बुधवारी बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्या दिवशी फुटबॉल खेळून प्रचार केला का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. (Prime Minister Modi enjoyed playing football)

पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मोदींनी निळ्या रंगाचे स्पोर्टस् जॅकेट घालून खेळले. त्यांनी गोल नोंदवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खेळाडूसोबत जल्लोषही साजरा केला. पंतप्रधानांनी फोटो आणि व्हिडिओही केले. त्यामध्ये ‘गंगटोकच्या एका सुंदर सकाळी सिक्कीममधील माझ्या तरुण मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासारखे दुसरे काही नाही’ असे एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. तरुणांसोबत उत्साहवर्धक फुटबॉलचे सत्र होते.

फुटबॉलचा आनंद लुटल्यानंतर पंतप्रधानांनी सिक्कीमच्या राज्यस्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तसेच अनेक प्रकल्पांचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते झाले. (Prime Minister Modi enjoyed playing football)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00