23
मुंबई : राज्यात गेली अनेक वर्षे धनगर आरक्षणाबाबत आंदोलन सुरु आहे. आज (दि.८) आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या मुंबईमधील ‘वर्षा’ बंगल्यावर धडक दिली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. (Dhangar Reservation)
सरकारने धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जीआर तत्काळ काढावा अशी मागणी आंदोलकांतर्फे यावेळी करण्यात आली. तसेच अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. पोलिसांनी यावेळी आंदोलकांना ताब्यात घेतले.
दुसरीकडे याच मुद्द्यावरून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे काही कार्यकर्ते मंत्रालयात आले व थेट मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना जाळीवरुन बाहेर काढले.
हेही वाचा :
- देशातील सर्वात श्रीमंत महिलेचा दणदणीत विजय
- जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेसचे सरकार; ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री
- सलमानच्या मानधनावर बिग बाँसकडून पाण्यासारखा पैसा खर्च