Home » Blog » मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द

Eknath Shinde : सोलापूर दौरा पाचव्यांदा रद्द

by प्रतिनिधी
0 comments
Eknath Shinde File Photo

महाराष्ट् दिनमान ऑनलाईन डेस्क :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्त्वाची अशी मंत्रिमंडळाची बैठकही रद्द करण्यात आली आहे. आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठकही पुढे ढकलली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा पाचव्यांदा रद्द झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आजची मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वाची मानली जात होती. (Eknath Shinde)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सकाळी साडेअकरा वाजता मुंबई विमानतळावरून सोलापूर शहरात होणाऱ्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी जाणार होते. हा कार्यक्रम आज साडेबारा वाजता होणार होता व त्याची संपूर्ण तयारी देखील प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या निवासस्थानी असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00