Home » Blog » जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, हरियाणात भाजपने घेतली आघाडी

जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, हरियाणात भाजपने घेतली आघाडी

Jammu Kashmir Election Result : जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, हरियाणात भाजपने घेतली आघाडी

by प्रतिनिधी
0 comments
Election File Photo

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बहुचर्चित जम्मू-काश्मिर आणि हरियाणा विधानसभेची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू झाली. त्यानुसार जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने मुसंडी मारल्याचे तर हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. (Jammu Kashmir Election Result)

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, जम्मू-काश्मिरमध्ये जम्मू-काश्मिर नॅशनल कॉन्फरन्सने ४२ जागांवर आघाडी घेतली होती. पाठोपाठ भाजप २६ आणि काँग्रेसने ९ जागांवर आघाडी घेतल्याचे चित्र होते. केंद्रातील भाजप सरकारने जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा असलेले ३७० कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच येथे निवडणुका घेण्यात आल्या. राज्यातील सर्व ९० जागांवर मतदान झाले होते. जम्मू-काश्मिर नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बडगाम आणि गंदेरबाल या दोन्ही मतदारसंघातून आघाडी घेतली आहे.

दुसरीकडे भारतीय जनता पक्ष हरियाणामध्ये पुन्हा हॅट्‌ट्रिक साधण्याच्या मार्गावर आहे. हरियाणातील ९० जागांपैकी ४९ जागांवर भाजप तर ३५ जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र नंतर भाजपच्या उमेदवारांचे मताधिक्य वाढत गेल्याचे चित्र होते. निकालाचा कल कायम असाच राहिल्यास येथे भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00