Home » Blog » ज्युनिअर हॉकी संघाच्या कर्णधारपदी अमीर अली

ज्युनिअर हॉकी संघाच्या कर्णधारपदी अमीर अली

Amir Ali : ज्युनिअर हॉकी संघाच्या कर्णधारपदी अमीर अली

by प्रतिनिधी
0 comments
Amir Ali File Photo

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  सुल्तान ऑफ जोहोर हॉकी करंडक स्पर्धेला मलेशियात १९ आक्टोंबरपासून प्रारंभ होत आहे. हॉकी इंडियाकडून या स्पर्धेसाठी भारतीय ज्युनिअर संघाची घोषणा करण्यात आली. संघाच्या कर्णधारपदाची धुरा अमीर अलीकडे सोपिवण्यात आली आहे. उपकर्णधारपदी रोहीत याची निवड झाली आहे. याचबरोबर गुरज्योत सिंगची निवड संघामध्ये करण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय वरिष्ठ संघाने जेतेपद राखत चांगली कामगिरी बजावली. या स्पर्धेत सिंग व अली या दोन्ही खेळाडूंनी भारतीय वरिष्ठ संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.  ज्युनियर संघाच्या गोलकिपरपदी बिक्रमिजित सिंग व अली खान यांची निवड झाली. याचबरोबर अनमोल एक्का, सुखिविंदर, शारदानंद तिवारी, तालिम प्रियोवार्ता, अंकीत पाल, चंदन यादव यांच्यासह नामवंत खेळाडूंचा संघात समावेश आहे.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00