महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगला देशवर दणदणीत विजय मिळवला. प्रत्युत्तरात बांगला देशने दिलेल्या १२७ धावांचे आव्हान टीम इंडियाने ११.५ षटाकात पार करत सामन्यांत विजय मिळवला. हा सामना ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियमवर खेळवण्यात आला. (IND vs BAN)
सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी केलेला अचूक मारा आणि खेळाडूंनी केलेले उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे बांगला देशचा संघ १२८ धावांवर गारद झाला. संघाकडून फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३-३ बळी घेतले. हार्दिक पांड्या, मयंक यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी १-१ विकेट घेतली.
बांगला देशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार सूर्यकुमार यादवने १४ चेंडूत २९ आणि संजू सॅमसनने १९ चेंडूत २९ धावा केल्या. हार्दिक पांड्याने १६ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. तर नितीश कुमार रेड्डी याने पदार्पण सामना खेळताना १५ चेंडूत नाबाद १६ धावा केल्या. बांगलादेशसाठी एकही गोलंदाज छाप सोडू शकला नाही. मुस्तफिजुर रहमान आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी १ विकेट घेतली. (IND vs BAN)
सामन्यावर भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व
सूर्याचा निर्णय योग्य होता. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले. बांगलादेशने पहिल्या षटकात ५ धावांत एक विकेट गमावली. अर्शदीप सिंगने लिटन दासला आपला शिकार बनवले. यानंतर बांगलादेशला १४ धावांवर दुसरा धक्का बसला. अर्शदीप सिंगने परवेझ हुसैन इमॉनला क्लीन बोल्ड केले. यानंतर बांगलादेश संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला आणि त्यांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली नाही. अशाप्रकारे बांगला देशला केवळ १२७ धावा करता आल्या. संघाकडून मेहदी हसन मिराजने सर्वाधिक नाबाद ३५ धावा केल्या आणि कर्णधार नजमुल हुसेन शांतोने २७ धावा केल्या.
Brilliant win for our boys, right after a special performance from our women’s team! 🤩 @arshdeepsinghh continues to be a game changer in the shorter formats, and great to see @chakaravarthy29 shine in his comeback match. All eyes on the second T20I in Delhi as we look to seal… pic.twitter.com/4NBYl7qpRB
— Jay Shah (@JayShah) October 6, 2024
हेही वाचा :
- अंबाबाई मंदिरातील गर्दीला ‘विधानसभे’ची झालर
- ‘स्वाभिमानी’चा २५ रोजी ऊस परिषदेत एल्गार
- ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड