महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बरेली (यूपी) येथील एका महिलेच्या पोटाची शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी तब्बल दोन किलो केस काढले. संबंधित महिला अतिदुर्मिळ अशा ‘Trichophagiaने ग्रस्त होती. हा एक अतिदुर्मिळ मानसिक आजार आहे. त्यात रुग्णाला केस चघळण्याची सवय जडते. करगैणा येथील या महिलेला वयाच्या पाचव्या वर्षांपासून स्वत:चेच केस चघळण्याची सवय जडली. गेली १६ वर्षे हा प्रकार सुरू होता. केस पोटात गेले आणि ते पोटाच्या पोकळीत साचून राहिले. आतड्याच्या काही भागांतही हे केस साचले होते. त्यामुळे तिला नीट जेवण जात नसे. सतत उलट्या होत असत. नातेवाईकांनी तिला रूग्णालयात दाखल केले. २० सप्टेबरला सिटी स्कॅन केले असता पोटात मोठ्या प्रमाणात केस साचल्याचे आढळले. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ते केस काढण्याचा निर्णय घेतला. २६ सप्टेबरला तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. (Health News)
धक्कादायक! महिलेच्या पोटातून काढले दोन किलो केस!!
Health News : धक्कादायक! महिलेच्या पोटातून काढले दोन किलो केस!!
62
previous post