Home » Blog » महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक धक्का

महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक धक्का

रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटाच्या वाटेवर

by प्रतिनिधी
0 comments
रामराजे नाईक निंबाळकर संग्रहित फोटो

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. महायुतीमधील आणखी एक मोठा नेता धक्का देण्याच्या तयारीत असून आजच रामराजे नाईक निंबाळकर महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)

रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज (ता. ५) रात्री फलटण येथे कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. या कार्यकर्त्यांशी विश्वासात घेऊन निर्णय घेणार आहेत परंतु, रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांच्या गटाची साथ सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय पक्का असल्याची माहिती आहे.. रामराजे यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण ही अजित पवार यांची साथ सोडतील. दीपक चव्हाण यांनी अजित पवार यांची साथ सोडल्यास हा अजित पवार यांच्यासाठी दुहेरी धक्का ठरेल.कारण काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांना विधानसभेचे उमेदवारी जाहीर केली होती. (Maharashtra Politics)

रामराजे निंबाळकर कुठेही जाणार नाहीत : अमोल मिटकरी

अजितदादा गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी रामराजे नाईक निंबाळकर गटातून बाहेर जाण्याचे वृत्त फेटाळून लावले. रामराजे नाईक निंबाळकर यांचा आजचा मेळावा कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी घेतलेला आहे. याचा अर्थ रामराजे निंबाळकर आणि दीपक चव्हाण शरद पवार गटात जाणार, असा होत नाही. रामराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वीही काहीही चर्चा होऊ दे, मी दुसरीकडे जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ते घाईगडबडीत कुठलाही निर्णय घेणार नाहीत.वेळ पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे त्यांच्याशी चर्चा करतील.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00