महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मंत्रालयात मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर उडी मारली. त्यांच्यासह आणखी दोन आमदार होते. (Narhari Zirwal)
सकाळपासून आदिवासी आमदारांचे मंत्रालयामध्ये आंदोलन सुरू आहे. सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आमदारांनी भेट घेतली. ते आज अँटर्नी जनरल तुषार मेहता यांच्याशी बोलणार आहेत. याचा निषेध म्हणून आमदारांनी संरक्षण जाळीवर उडी मारली. दरम्यान, मंत्रालयातील आंदोलनानंतर प्रतिक्रिया देताना नरहरी झिरवळ म्हणाले, मुख्यमंत्र्यांशी आमची धावती भेट झाली. धावत्या भेटीत मुख्य सचिव किंवा त्याच्याशी ज्यांचा संबंध असेल, कायद्याशी संबंधितांकडून आजच्या आज आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यायला हरकत नाही असं वाटतं. आता त्यांनी ते करावे. (Narhari Zirwal)
नरहरी झिरवाळ यांची मागणी….
सरकारने धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका मागे घ्यावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे.ज्या समाजाने आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं, त्यांच्या अधिकाराचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. पेसा भरतीच्या ऑर्डर तयार असताना कोर्टाच्या आदेशामुळे त्या देण्यात आलेल्या नाहीत. आम्ही पेसा भरतीबाबत आम्ही आग्रही आहोत, असं झिरवळ म्हणाले.
हेही वाचा :
- अफजलखान वधानंतर हिंदू मुस्लिमांबाबत शिवाजी महाराज काय म्हणाले…
- प्रशांत किशोर राजकारणात; ‘जनसुराज पक्षा’ची घोषणा
- हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी