Home » Blog » इराणी चषकात द्विशतक झळकवत सरफराजची विक्रमाला गवसणी

इराणी चषकात द्विशतक झळकवत सरफराजची विक्रमाला गवसणी

Sarfaraz Khan : बनला इराणी स्पर्धेत द्विशतक झळकवणारा मुंबईचा पहिला खेळाडू

by प्रतिनिधी
0 comments
Sarfaraz Khan

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या सर्फराज खानने इराणी चषक स्पर्धेत विक्रम नोंदवला आहे. सामन्यात सरफराजने २५३ चेंडूमध्ये २३ चौकार आणि ३ षटकार लगावत द्विशतक झळकावले. शेष भारत संघाविरूद्ध संघाविरूद्ध खेळताना त्याने ही कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो मुंबईचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. (Sarfaraz Khan)

सरफराजने याच वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून कसोटीमध्ये पदार्पण केले होते. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याची निवड झाली होती. परंतु, विराट कोहली, ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्या पुनरागमनामुळे त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नव्हती. इराणी चषकात रवी शास्त्री, युवराज सिंग, ऋद्धिमान साहा, यशस्वी जैस्वाल यांच्यासह आणखी आठ खेळाडूंनी द्विशतके लगावली आहेत. इराणी स्पर्धेत सर्वाधिक खेळी करण्याचा विक्रम वसीम जाफरच्या नावावर आहे. तर, मुरली विजय दुसऱ्या क्रमांकावर आहे.

इराणी कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा मुंबईचा फलंदाज

ही खेळी करत सरफराजने मुंबईच्या रामनाथ पारकर यांचा विक्रम मोडला आहे. रामनाथ यांनी याच स्पर्धेत नाबाद १९४ धावांची खेळी केली होती. त्यांनी १९७२ मध्ये ही कामगिरी केली होती. तर, अजिंक्य रहाणे १९१ धावांच्या खेळीसोबत या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. यासह सुधाकर अधिकारी(173), झुबिन भरुचा (164) यांचा समावेश आहे. (Sarfaraz Khan)

सामन्यात काय झाल?

लखनौच्या एकाना स्टेडियमवर मुंबई आणि शेष भारत यांच्यात इराणी स्पर्धेतील सामन्याला सोमवारी (दि.१) सुरूवात झाली. सामन्यात शेष भारत संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ अवघ्या 4 धावांवर बाद झाला. यानंतर संघाने 37 धावांत 3 विकेट गमावल्या. मात्र, त्यानंतर रहाणे आणि सरफराज जोडीने डावाची जबाबदारी घेत मोठी भागीदारी रचली. मात्र शतकाच्या उंबरठ्यावर असलेला रहाणे बाद झाला. तो 234 चेंडूत 97 धावा करून बाद झाला. यानंतर सरफराजने एक बाजूने धावा करत द्विशतक पूर्ण केले. यानंतर त्याने शार्दुल ठाकूरच्या साथीने अर्धशतकी भागिदारीही रचली. मुंबईने दुस-या दिवसाअखेर पहिल्या डावात 9 विकेट गमावत 536 धावा केल्या आहेत.सध्या सरफराज 221* आणि एम जुनेद खान 0 धावांवर नाबाद आहेत.

इराणी चषकमध्ये द्विशतक फटकावणारे खेळाडू

  • वसीम जाफर : 286 : विदर्भ : विरुद्ध शेष भारत : 14 मार्च 2018 (नागपूर)
  • मुरली विजय : 266 : रेस्ट ऑफ इंडिया : विरुद्ध राजस्थान : 21 सप्टेंबर 2012 (बंगळूरू)
  • प्रवीण आमरे : 246 : शेष भारत : विरुद्ध बंगाल : 2 नोव्हेंबर 1990 (बंगळूरू)
  • सुरिंदर अमरनाथ : 235* : दिल्ली : विरुद्ध शेष भारत : 23 ऑक्टोबर 1980 (दिल्ली)
  • सरफराज खान : 221* : मुंबई : विरुद्ध शेष भारत : 1 ऑक्टोबर 2024 (लखनऊ)
  • रवि शास्त्री : 217 : शेष भारत : विरुद्ध बंगाल : 2 नोव्हेंबर 1990 (बंगळूरू)
  • यशस्वी जैस्वाल : 213 : शेष भारत : विरुद्ध मध्य प्रदेश : 1 मार्च 2023 (ग्वाल्हेर)
  • पार्थशास्त्री शर्मा : 206 शेष भारत : विरुद्ध : 27 जानेवारी 1978 (वानखेडे)
  • युवराज सिंग : 204* : शेष भारत : विरुद्ध मुंबई : 1 ऑक्टोबर 2010 (जयपूर)
  • ऋद्धिमान साहा : 203* शेष भारत : विरुद्ध गुजरात : 20 जावेवारी 2017 (ब्रेबोर्न)
  • गुंडप्पा विश्वनाथ : 200* : कर्नाटक : शेष भारत : 25 ऑक्टोबर 1974 (अहमदाबाद)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00