Home » Blog » Ladki Sister Scheme : लाडक्या बहिणींना करावी लागणार ई-केवायसी

Ladki Sister Scheme : लाडक्या बहिणींना करावी लागणार ई-केवायसी

by प्रतिनिधी
0 comments
Ladki Sister Scheme

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता ई केवायसी करावी लागणार आहे. या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. येत्या दोन महिन्यात ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. (Ladki Sister Scheme)

मंत्री तटकरे यांनी एक्स वर अशी पोस्ट केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील दोन  महिन्यांच्या आत सदर ई- केवायसी  प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. (Ladki Sister Scheme)

ई केवायसी करण्याची प्रक्रिया अशी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना  https://ladakibahin.maharashtra.gov.in यावेबसाईटला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

स्टेप वन: प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वेबसाईटला भेट द्या.

स्टेप टू :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभर्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करा. यानंतर नवीन वेबपेज ओपन होईल.

स्टेप थ्री : ई- केवायसी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल.  यानंतर कॅप्चा कोड नोंदवा, तो नोंदवताना चूक होणार नाही याची दक्षता घ्या. कॅप्चा कोड नोंदवल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या.

स्टेप फोर : आधार प्रमाणीकरण संमती मधील मजकूर वाचून मी सहमत आहे, या पर्यायावर क्लिक करा. यानंतर ओटीपी पाठवा हा पर्याय निवडा, यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल. (Ladki Sister Scheme)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00