Home » Blog » Maratha agitation in Mumbai: मराठा आंदोलकांचा मुंबईत वाढता ओघ

Maratha agitation in Mumbai: मराठा आंदोलकांचा मुंबईत वाढता ओघ

by प्रतिनिधी
0 comments
Maratha agitation

मुंबई : जमीर काझी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निकराचा लढा देण्यासाठी मराठा आंदोलक अजूनही राजधानी मुंबईत दाखल होत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून रेल्वे, बसेस आणि अन्य खासगी वाहनांनी मराठा आंदोलकांचे जथ्थेच्या जथ्थे येत आहेत. त्यामुळे मुंबईत सर्वत्र भगवे वादळ दिसत आहे. सर्व रेल्वे स्टेशन्सवर त्यातही विशेषत: सीएसटी, आझाद मैदान, मुंबई महापालिकेचा परिसर अशा ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलक थांबून आहेत. (Maratha agitation in Mumbai)

कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतायचे नाही, असा ठाम निर्धार करून आंदोलक आले आहेत. आंदोलकांचा उत्साह कायम आहे. ‘मनोज जरांगे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है,’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून जात आहे.

सीएसटीकडे येणाऱ्या सर्व लोकल्स मराठा आंदोलकांनी गच्च भरून येत आहेत. त्यामुळे येथे पाय ठेवायलाही जागा नाही, अशी परिस्थिती आहे. (Maratha agitation in Mumbai)

आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या आंदोलकाला अस्वस्थ होऊ लागले. त्यावेळी अन्य आंदोलक त्याच्या मदतीला धावून गेले.

अनेक रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफार्मवर मराठा आंदोलक मोठ्या संख्येने थांबून आहेत. (Maratha agitation in Mumbai)

आंदोलकाच्या प्रचंड गर्दीत मुंबईतील नागरिक आणि प्रवाशांना सूचना देताना पोलिस.

मुंबईतील आंदोलकांची गर्दी लक्षात घेऊन ठिकठिकाणी शीघ्र कृती दलासह प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00