Home » Blog » WTC गुणतालिकेतील भारताचे अव्वल स्थान भक्कम

WTC गुणतालिकेतील भारताचे अव्वल स्थान भक्कम

WTC गुणतालिकेतील भारताचे अव्वल स्थान भक्कम

by प्रतिनिधी
0 comments
WTC

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : चेन्नई आणि कानपूर कसोटीत दमदार कामगिरी करत टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत बांगला देशचा २-० ने पराभव करत मालिका खिशात घातली. सध्या बांगला देश संघ भारताच्या दौऱ्यावर आहे. कानपूर कसोटीत विजय मिळवत टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील (WTC) आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे.

कानपूर कसोटीतील विजयानंतर टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारी ७४.२४  झाली आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेश गुणतालिकेत पाचव्या स्थानावर होता. परंतु, सलग दोन सामन्यातील पराभवामुळे बांगला देशची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025च्या गुणतालिकेत ६२.५० टक्केवारीसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. तर, ५५.५६ टक्केवारीसह लंकन संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. कसोटीत बॅझ बॉल खेळी आणणारा इंग्लंड  इंग्लंडचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे, ज्यांची विजयाची टक्केवारी ४२.१९ आहे. (WTC)

ICC WTC गुणतालिकेत भारत अव्वल

कानपूर कसोटी जिंकून भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. टीम इंडियाने ११ सामन्यांत ८वा विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. भारताची या पुढची मालिका न्यूझीलंडविरुद्ध आहे. ३ सामन्यांची ही मालिका देखील भारतीय भूमीत खेळवली जाणार आहे. त्यानंतर रोहितसेना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर मालिका खेळायला जाईल. ५ सामन्यांच्या या मालिकेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00