Home » Blog » Monorail suddenly stopped: मुंबईत मोनोरेल बंद पडली, काचा फोडून प्रवाशी बाहेर

Monorail suddenly stopped: मुंबईत मोनोरेल बंद पडली, काचा फोडून प्रवाशी बाहेर

by प्रतिनिधी
0 comments
Monorail suddenly stopped

मुंबई : मुंबईला मुसळधार पावसाने मोठा तडाखा दिला आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही स्थगित करण्यात आल्या आहेत. या परिस्थितीत मोनोरेलचा आधार घेणाऱ्या प्रवाशांनाही संकटाचा सामना करावा लागला. मुंबईमधील चेंबूर भक्ती पार्क मार्ग या दरम्यानची मोनोरेल अचानक मध्येच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. (Monorail suddenly stopped)

मुंबई महापालिकेचे अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरू केले. गुदमरलेल्या प्रवाशांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला, मात्र दरवाजे बंद असल्याने त्यांना बाहेर पडता येईना. गर्दीमुळे ते घामाघूम झाले. त्यामुळे प्रवाशांनी बाहेर पडण्यासाठी काच फोडली. दरम्यान तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवानांनी वरती जाऊन सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरू आहे. तसेच आता एक दरवाजा उघडला असून सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर येत आहे. (Monorail suddenly stopped)

मुंबईमधील चेंबूर भक्ती पार्क मार्ग या दरम्यानची मोनोरेल अचानक मध्येच बंद पडली असल्याची माहिती समोर आली आहे.

मोनोरेलमध्ये अनेक प्रवासी अडकले होते. जवळपास एका तासांपासून अनेक प्रवासी बंद पडलेल्या मोनोरेलमध्ये अडकले होते. त्यांच्या मदतीसाठी तात्काळ स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. तसेच मदतीसाठी क्रेनही घटनास्थळी दाखल झाली असून प्रवाशांना मोनोरेलमधून बाहेर काढण्यात येत आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00