Home » Blog » Body found hanging: लाईनमनचा मृतदेह तीन तास लटकलेल्या अवस्थेत

Body found hanging: लाईनमनचा मृतदेह तीन तास लटकलेल्या अवस्थेत

by प्रतिनिधी
0 comments
Body found hanging

बेळगाव : प्रतिनिधी : मुगळीहाळ येथे विजेच्या खांबावर दुरुस्ती करण्यासाठी चढलेल्या लाईनमनबाबत धक्कादायक घटना घडली. या लाईनमनचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे लाईनमनचा मृतदेह तीन तासांहून अधिक काळ विजेच्या खांबावर लटकलेला होता. वीज पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिल्यानंतरही अधिकारी घटनास्थळी फिरकले नाहीत. (Body found hanging)

बगरनाळ गावातील २५ वर्षीय मारुती आवळी हे वीज पुरवठा मंडळाचे लाईनमन होते.

मुगळीहाळ गावात विजेच्या खांबावर चढून ते काम करत होते. त्यांना अचानक विजेचा धक्का बसला आणि  त्यांचा जागीच मृत्यू झाला. विजेच्या खांबावर काम करत असताना ही दुर्घटना घडली. (Body found hanging)
या घटनेनंतर आवळी यांचा मृतदेह तीन तासांपेक्षा जास्त काळ खांबावर लटकलेल्या अवस्थेतच होता. घटनेची माहिती देऊनही वीज पुरवठा मंडळाचे वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी मदतीसाठी जवळ आले नाहीत. अधिकाऱ्यांच्या या मनोवृत्तीविरोधात मुगळीहाळ गावातील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा :
 मीरा भाईंदर मोर्चात मराठी माणसांची धरपकड

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00