Home » Blog »  Sunita williams : सुनीता विल्यम्सला परत आणण्यासाठी ‘नासा’ची मोहीम

 Sunita williams : सुनीता विल्यम्सला परत आणण्यासाठी ‘नासा’ची मोहीम

by प्रतिनिधी
0 comments
 Sunita williams

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मूळ भारतीय अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर सुखरूप आणण्यासाठी ‘नासा’ची (NASA-National Aeronautics and Space Administration ) स्पेसएक्स क्रू-९ मोहीम आज (दि.२८) सज्ज झाली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून २६ सप्टेंबर रोजी दोन अंतराळवीर जाणार होते. तथापि, हेलन चक्रीवादळामुळे मोहिमेला विलंब झाला. जाणून घेऊया या मोहिमेबद्दल.

निक हेग करणार मोहिमेचे नेतृत्व

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी ५ जून रोजी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळ यानातून तिसऱ्यांदा अंतराळात यशस्वी उड्डाण केले. ही मोहीम एका आठवड्यासाठी होती. मात्र तांत्रिक बिघाडामुळे हे दोघेही तीन महिन्यांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) आहेत. बोईंग स्टारलाइनरमधील बिघाडामुळे या दोघांचे पृथ्वीवर परतणे फेब्रुवारी २०२५ पर्यंत लांबले आहे.

आता या दोघा अंतराळवीरांना परत आणण्यासाठी एलॉन मस्कच्या स्पेस एक्सची क्रू-९ मोहीम आज (दि.२८) सुरू होणार आहे. हवामानाचा अंदाज घेऊन भारतीय प्रमाणवेळेनुसार हे यान रात्री १०.४७ झेपावणार आहे. फ्लोरिडा येथील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशन येथून हे यान झेपावेल. ‘नासा’चे अंतराळवीर निक हेग या मोहिमेचे नेतृत्व करतील. रोसकॉसमॉस कॉस्मोनॉट अलेक्झांडर गोर्बुनोव्ह मिशन तज्ज्ञ म्हणून काम पाहतील.

 Sunita williams : कुठे पाहता येईल मोहीम?

या मोहिमेचे थेट कव्हरेज ‘नासा’ची अधिकृत वेबसाईट आणि यू ट्यूबवर ईस्टर्न डेलाइट वेळेनुसार सकाळी ९.१० वाजता पाहता येणार आहे.

काय आहे मोहिमेचे वैशिष्ट्य?

‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार,  क्रू-९ ही पॅडवरून प्रक्षेपित होणारी पहिली मानवयुक्त अंतराळ उड्डाण मोहीम असेल. क्रू-९ फ्लाइटमध्ये चार क्रू मेंबर सहभागी होणार होते. अंतराळवीर झेना कार्डमन आणि स्टेफनी विल्सन यांचाही यात समावेश होता. मात्र परत येताना यानात सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना जागा रहावी, यासाठी झेना आणि स्टेफनी यात सहभाग होणार नाहीत.

हेही वाचा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00