Home » Blog » Shelar’s criticism Dubey : कोणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगत नाही : अशिष शेलार

Shelar’s criticism Dubey : कोणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगत नाही : अशिष शेलार

by प्रतिनिधी
0 comments
Shelar’s criticism Dubey

मुंबई : प्रतिनिधी : तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर येऊन दाखवा, तुम्हाला आपटून मारू,…लक्षात ठेवा तुम्ही आमच्या पैशावर जगता, असे वक्तव्य भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंचे नाव न घेता केंद्रीय मंत्री निशिकांत दुबे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे विधानसभेत पडसाद उमटले. भाजपचे मंत्री आमदार अशिष शेलार यांनी दुबे यांचे नाव घेता तंबी दिली. कोणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगत नाही. महाराष्ट्र तर मुळीच नाही अशा तिखट भाषेत दुबे यांना सडेतोड उत्तर दिले. (Shelar’s criticism Dubey)

विधानसभेत बोलताना मंत्री अशिष शेलार म्हणाले, ‘झारखंडे एक भाजप खासदार आहेत, त्यांनी एक विधान केले आहे जे सध्या समाज माध्यमातून फिरते आहे. या सभागृहाच्या माध्यमातून भाजपची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. त्या खासदारांनी कायद्यात बसून जरुर भूमिका मांडावी. पण मराठी माणसाच्या कर्तबगारीवर सवाल उपस्थित करण्याची गरज नाही. देशाच्या जेडीपीमधील योगदान हे संपूर्ण देश जाणतो. ज्या मराठी माणसाने पहिला सिनेमा केला. आमच्या छत्रपती शिवाजी महारांनी या देशातील पहिले आरमार निर्माण केले. अशा मराठी माणसाच्या कर्तबगारीवर कोणीही प्रश्न विचारु नये. त्या खासदाराने तर बिलकूही विचारु नये’ अशी तंबी शेलार यांनी खासदार दुबे यांना दिली. (Shelar’s criticism Dubey)

‘कोणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगत नाही. महाराष्ट्र तर मुळीच नाही. मी त्यांचे नाव यासाठी घेतले नाही. कारण ते या सभागृहाचे सदस्य नाहीत. पण मराठी माणसाचे हित आणि अमराठी माणसावर अन्याय होऊ नये. या दोन्ही भूमिका हे राज्य सरकार घेईल, अशी भूमिका शेलार यांनी स्पष्ट केली. खासदार दुबे यांनी ठाकरे बंधूवर टीका करताना ‘आपल्या घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ, महाराष्ट्र बाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारु’ असे आव्हान दिले. (Shelar’s criticism Dubey)

You may also like

error: Content is protected !!