Home » Blog » ‘वारणा’चे पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेज पुढील वर्षीपासून

‘वारणा’चे पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेज पुढील वर्षीपासून

पुढील वर्षी ‘वारणा’चे पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेज सुरू होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी दिली.

by प्रतिनिधी
0 comments

वारणानगर : प्रतिनिधी
जातीवंत म्हैशीच्या पैदाशीसाठी मेहसाना आणि मुऱ्हा म्हैशी वारणा दूध संघामार्फत खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच संघाच्या कार्यस्थळावर विक्री केंद्रही सुरू केले जाईल. या केंद्रातून म्हैस खरेदी करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना ४२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी केली. देशातील असे पहिलेच केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले. दूध संघाला ५९ कोटींचा ढोबळ नफा झाल्याचे सांगून कोरे यांनी पुढील वर्षी पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेज सुरू होणार असल्याची माहिती दिली.
वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या ५६ व्या वार्षिक सभेत डॉ. कोरे बोलत होते.
डॉ. कोरे म्हणाले, म्हैस आणि गाय दूधात प्रचंड तफावत आहेत. म्हैशीच्या दुधाचीच उत्पादने बनवली जातात. त्यामुळे वारणानगर येथील केंद्रावर सुमारे ४०० ते ५०० म्हैशींचा गोठा तयार करण्यात येणार आहे. परराज्यातूंन मेहसाना आणि मुऱ्हा जातीच्या म्हैशी संघामार्फत खरेदी केली जाणार आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हैशी खरेदी करण्यासाठी लागणारा वेळ, वाहतूक खर्च आणि होणारी फसवणूक टळणार आहे.

वारणा संघाचे दूध भारतीय सैन्यदलात, आदीवासी समाजातील मुलांना सुगंधी दूध पुरवठा, मेट्रो, शताब्दी, राजधानी व वंदे मातरम एक्स्प्रेस या रेल्वेमध्ये वारणाची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात दूध पुरवठा करण्याचे टेंडरही संघाला मिळाले आहे. रिलायन्स, डी मार्ट या मॉलच्या माध्यमातून १९ कोटींची विक्री झाल्याचेही कोरे यांनी सांगितले.
कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत केले. वारणा समूह विद्यापीठ मंजूर झाल्याबद्दल आमदार डॉ. कोरे यांचा सत्कार करण्यात आला. सहकारमहर्षि तात्यासाहेब कोरे यांना पद्मभूषण पुरस्कार मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00