Home » Blog » Latthe: दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे बहुआयामी व्यक्तिमत्व

Latthe: दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे बहुआयामी व्यक्तिमत्व

ज्येष्ठ संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे मत

by प्रतिनिधी
0 comments
Latthe

कोल्हापूर : प्रतिनिधी : दिवाणबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे हे बहुआयामी व्यक्तीमत्व होते.  लठ्ठे यांनी लिहिलेले शाहू महाराजांचे चरित्र नवसंशोधकांना एक साधनग्रंथ म्हणून मार्गदर्शक ठरेल, असे मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठ आणि लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृह येथे दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. (Latthe)

आण्णासाहेब लठ्ठे यांनी १९२४  मध्ये लिहिलेल्या छत्रपती शाहू महाराज यांच्यावरील इंग्रजी भाषेतील चरित्र ग्रंथाच्या पुनरावृत्तीच्याप्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला.  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शाहू छत्रपती  तर अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के उपस्थित होते. यावेळी  प्र-कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शांतिनाथ कांते, व्हाईस चेअरमन चंद्रकांत पाटील, मानद सचिव  सुहास पाटील, लठ्ठे फौंऊंडेशनचे विश्वस्त डॉ. भरत लठ्ठे, व संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते. (Latthe)

डॉ. जयसिंगराव पवार यांनी सत्यशोधक आण्णासाहेब लठ्ठे या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.  दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे यांचे व्यक्तीमत्व दशपैलू असून राजर्षी शाहू महाराज यांची कृती आणि विचार पुढे नेण्याचे काम त्यांनी केले आहे. आण्णासाहेब लठ्ठे यांच्या कार्याची ओळख करून देताना त्यांनी आण्णासाहेब लठ्ठे हे सत्यशोधक विचारवंत, ब्राम्हणेतर नेता, उत्तम व कार्यक्षम प्रशासक, अर्थतज्ञ, अर्थमंत्री, समाजसुधारक व धर्मसुधारक, पत्रकार, कायदेतज्ञ, शाहू चरित्रकार, करवीररत्न, दिवाणबहाद्दूर, प्राध्यापक असे बहूआयामी व्यक्तीमत्व त्यांना लाभले होते. आण्णासाहेब लठ्ठे यांनी लिहिलेले शाहू महाराजांचे चरित्र नवसंशोधकांना एक साधनग्रंथ म्हणून मार्गदर्शक ठरेल असे उद्गार त्यांनी या प्रसंगी काढले.

 डॉ. पवार म्हणाले, आण्णासाहेब लठ्ठे एक थोर समाजशिक्षक होते. त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता नष्ट करून समाजातील सर्व घटकांना समान संधी व समान स्वातंत्र्य मिळावे यासाठी पुढाकार घेतला. सत्यशोधक समाज घडविण्याचा हा मूलभूत गाभा असल्याचा विचार त्यांनी समाजापुढे मांडला. सत्यशोधन म्हणजे समाजशिक्षण हा विचार आण्णासाहेब लठ्ठे यांनी मांडला. (Latthe)

खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी करवीर संस्थानातील आण्णासाहेब लठ्ठे यांचे योगदान तसेच त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि साहित्यिक क्षेत्रातील योगदान यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. शाहू महाराजांच्या तीन पिढयांशी आण्णासाहेब लठ्ठे यांचे घनिष्ट संबंध होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आण्णासाहेब लठ्ठे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील मोलाच्या कामगिरीबद्दल उपस्थितांना माहिती दिली. २१ व्या शतकातील समाजाने आण्णासाहेब लठ्ठेंचे विचार पुढे नेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. राजर्षी शाहू महाराज आणि आण्णासाहेब लठ्ठे या दोन व्यक्तीमत्वांमध्ये ‘सत्यशोधक’  हा समान विचार असल्याचे मत व्यक्त केले. आण्णासाहेब लठ्ठेंच्या कर्तृत्वावर लहान पुस्तिका प्रकाशित करावी हा विचार व्यक्त केला. या कार्यक्रमाचे आभार कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. हेमा माणगावे व प्रा. सौ. पद्मजा पाटील यांनी केले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00